एक्स्प्लोर

Beed News: कमरेला बिसलरीची रिकामी बाटली; सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगताना दिसला अन्...; बीडमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुलतज्ञ विभाग प्रमुखांचा तलावात बुडून मृत्यू

Beed News: बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे भुलतज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा तलावात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Beed News: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भुलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे (Dr Abhimanyu Tarkase) यांचा आज सकाळी तलावात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अंबाजोगाई शहरालगत असलेल्या 'काळवीट साठवण तलावात' सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एका वरिष्ठ डॉक्टरांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण अंबाजोगाई शहर आणि वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अभिमन्यू तरकसे हे गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काळवीट साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. ते एक उत्तम पोहणारे म्हणूनही परिचित होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे ते एकटेच तलावावर पोहण्यासाठी गेले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या (बिसलरी बाटल्या) देखील बांधल्या होत्या, जेणेकरून पाण्यात समतोल राखता येईल. मात्र, पाण्यात उतरल्यानंतर नेमके काय घडले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Beed News: सांडव्याजवळ तरंगताना आढळला मृतदेह

डॉ. तरकसे पाण्यात उतरल्यानंतर काही वेळातच, तलावाच्या सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे तिथे आलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले आणि खात्री केली असता, हा मृतदेह डॉक्टर तरकसे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण अंबाजोगाई परिसरात पसरली आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली.

Beed News: शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने डॉ. तरकसे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आता या शभविच्छेदनाच्या अहवालानंतर डॉक्टर तरकसे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. डॉक्टर तरकसे यांच्या निधनानंतर अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!

Pune Crime: प्रवासी भरण्याच्या वादाने संतापाचं टोक गाठलं, पुण्यात रिक्षाचालकाला बेदम मारहाण, थेट पुलावरून खाली फेकलं, नवले ब्रिजवर नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: गुंगीचे औषध घालून बळजबरीनं आधी मंचुरियन खाऊ घातले, नंतर लॉजवर दोघांकडून अत्याचार, ब्लॅकमेल करत तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळं सोनंही उकळले, अंबाजोगाई हादरलं!
गुंगीचे औषध घालून बळजबरीनं आधी मंचुरियन खाऊ घातले, नंतर लॉजवर दोघांकडून अत्याचार, ब्लॅकमेल करत तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळं सोनंही उकळले, अंबाजोगाई हादरलं!
Beed Crime News: 'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन', अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठले अन्...; घटनेनं बीडमध्ये खळबळ
'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन', अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठले अन्...; घटनेनं बीडमध्ये खळबळ
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले
Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Nagpur Crime: नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Embed widget