एक्स्प्लोर

पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला

अण्णांचे भरपूर स्वप्न आहेत, आता ते मी पूर्ण करेल. गावकऱ्यांच्या लढ्यामुळेच आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत, आमची इच्छा नव्हती.

बीड : जिल्ह्यातील (Beed) मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला. जोपर्यंत अण्णा होते तोपर्यंत त्यांनी गावकऱ्यांसाठी जीवन गमवलं. त्याचप्रमाणे आता शेवटच्या क्षणापर्यंत गावकऱ्यांनी इच्छा दाखवली म्हणून मी देखील उमेदवारी (Election) अर्ज दाखल करत आहे. मी गावाची सेवा करेन असे, अश्विनी देशमुख यांनी म्हटलं. तर, अश्विनी देशमुख यांच्याविरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांनी सर्वसाधारण गटातून सरपंच पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे.  

अण्णांचे भरपूर स्वप्न आहेत, आता ते मी पूर्ण करेल. गावकऱ्यांच्या लढ्यामुळेच आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत, आमची इच्छा नव्हती. मात्र, सर्वसामान्य जनतेने, गावकऱ्यांच्या इच्छामुळेच आम्ही या निवडणुकीत उतरलो, असे अश्विनी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर म्हटले. तर, मस्साजोग ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणुकीसाठी स्वरूपानंद देशमुख यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, येथील निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे चित्र स्पष्ट झालं आहे. 

न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं

सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरपंच पदावरुन संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहून पतीला न्याय कसे भेटेल हेच त्यांनी पाहिलं पाहिजे, असा सल्लाच स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांना दिलाय. दिवंगत संतोष देशमुख यांच्या न्यायिक लढाईसाठी आजही गाव पाठीशी आहे आणि उद्याही राहील. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचं गाव एकत्र आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्व ग्रामस्थांचा उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, मी ही निवडणूक लढवणार असल्याचे स्वरुपानंद देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं. 

असा आहे सरपंच निवडणूक कार्यक्रम 

7 ते 13 एप्रिल 
अर्जाची छाननी - 15 एप्रिल 
अर्ज मागे घेण्याची तारीख - 17 एप्रिल 
मतदान - 28 एप्रिल 
निकाल - 29 एप्रिल

हेही वाचा

बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
Suresh Dhas: बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Beed News: गहिनीनाथ गडावर CM फडणवीसांनी सुरेश धसांचं नाव घेतलं; भाविकांमधून एकज आवाज, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा
गहिनीनाथ गडावर CM फडणवीसांनी सुरेश धसांचं नाव घेतलं; भाविकांमधून एकज आवाज, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
Shubman Gill: अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
Suresh Dhas: बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Washington Sundar: गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
Tamilnadu Custodial Deaths: बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
Public Interest Litigations: आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Women Reservation Bill: केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
Embed widget