बीड :शहरातील (Beed) बार्शी रोड परिसरात एका विवाह सोहळ्या दरम्यान लग्नातील आतिषबाजीमुळे गंभीर दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत एका फोटोग्राफरला गंभीर दुखापत झाली असून त्याचे लाखो रुपयांचे व्यावसायिक साहित्य देखील घटनेत जळून खाक झाले. याप्रकरणी संबंधित लग्नसोहळ्याचा इव्हेंट आयोजक आणि फटाके व्यवस्थापन करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी फोटोग्राफर असोसिएशनकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मागील महिन्यात घडलेल्या या घटनेचे व्हिडिओ (Video) आता समोर आला आहे. तर, फोटोग्राफर असोसिएशनने जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले.  

Continues below advertisement

बीड शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात 28 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या विवाह सोहळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही फटाकेबाजी आवश्यक सुरक्षा उपाय व नियमांचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप जखमी तरुणाच्या कुटुंबाने केला. घटनेत फोटोग्राफर अभिषेक कदम हा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपचारही करण्यात आले आहेत. मात्र, या दुर्घटनेमुळे मंगलकार्यालयात होणाऱ्या आतिषबाजीच्या सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे. लग्नकार्यात फटाके उडवताना, किंवा आतिषबाजी करताना, या सोहळ्यातील उपस्थित नागरिकांच्या जीवाला धोका होईल किंवा दुखापत होईल असे कुठलेही कृत्य होता कामा नये, त्यासाठी काही नियमावली आखून दिली पाहिजे. तसेच, संबंधित दारुगोळा वा फटाक्यांची आतिषबाजी करताना त्या फटाक्यांचा दर्जाही पाहायला हवा, जेणेकरुन अपघात होणार नाही.  

दरम्यान, फोटोग्राफर्स असोसिएशनच्या टीमने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत यातील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेतून सावरल्यानंतर याबाबत कुटुंबाने तक्रार दिली आहे. त्यामुळेच, आज फोटोग्राफर असोसिएशननेही याबाबत कारवाईची मागणी केली.

Continues below advertisement

हेही वाचा

महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच