Beed Crime : पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही घटना बीडच्या (Beed Crime) आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील कासारी गावात घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकरावर आष्टी पोलीस (Beed Crime) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अधिकची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील (Beed Crime) कासारी गावात एक दाम्पत्याचा संसार सुरु होता. मात्र, संसार सुरु असतानाच बायकोचे विवाहबाह्य संबंध सुरु झाले. पत्नी गावातीलच एका परपुरुषासोबत प्रेमसंबंध ठेवल्याने नवरा नैराश्यात गेला. याबाबत नवऱ्याने अनेकदा त्याच्या पत्नीला समजावून देखील सांगितलं. मात्र, तिच्यात कोणताही फरक जाणवला नाही. आपण एवढं समजावूनही पत्नीमध्ये कोणताही फरत दिसत नाही, हे लक्षात आल्यानंतर पतीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कल्याणमध्ये नशेचं इंजेक्शन देऊन महिनाभर सामूहिक अत्याचार, 7 जणांवर गुन्हा
कल्याणमध्ये एका 21 वर्षीय तरुणीला नशेचं इंजक्शन देऊन महिनाभर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजेच जवळच्याच मैत्रिणीने धोका दिल्यामुळे तिच्यावर अतिप्रसंगाची घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चार ते पाच जणांकडून तरुणीवर अत्याचार
बल्याणी परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचा घरात आजीबरोबर वाद झाला होता. त्यानंतर ही तरुणी रागाच्या भरात घर सोडून कामावर ओळख झालेल्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेली होती. मात्र, मैत्रिणीने गैरफायदा घेत दुसऱ्या मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला नशेचे इंजेक्शन देत कोंडून ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे मैत्रिणीच्या ओळखीतील चार ते पाच जणांनी तिच्यावर महिनाभर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नशेचं इंजेक्शन देऊन महिनाभर सामूहिक अत्याचार, मैत्रिणीनेच धोका दिला, 7 जणांवर गुन्हा
