1 तासामध्ये माणसासकट सगळं जाळेन, वाल्मिक कराडचा फोन गेलेल्या सुग्रीव कराडची मस्साजोगच्या तरुणाला धमकी, नेमकं काय घडलं?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृहातील कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रारही केली होती. त्यामुळे हा सगळाच प्रकार अति संवेदनशील झाला आहे.

Beed Sugriv Karad Viral Video: सध्या बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोपी वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला कॉल गेल्याच्या खासदार बजरंग सोनवणे यांच्या आरोपानंतर बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. खा. सोनवणे यांच्या मुलाला विलास घुले प्रकरणात अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप केल्यानंतर उमरी टोल नाक्यावर मस्साजोगच्या देशमुख नामक तरुणाला सुग्रीव कराडने एका तासात सगळं जाळण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, टोल न भरल्यानेहा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचही समोर येतंय.
नेमकं प्रकरण काय?
वाल्मिक कराडने सुग्रीव कराडला केलेल्या कथित कॉल रेकॉर्डिंग प्रकरण तापताना दिसत आहे. दरम्यान, सुग्रीव कराडचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मस्साजोगच्या देशमुख नामक तरुणाला उमरी टोल नाक्यावर माणसासकट एका तासात सगळं जळण्याची धमकी सुग्रीव कराडने दिल्याचं समोर येतंय. सुग्रीव कराड ने टोल न भरल्याने वाद झाल्याचा प्रकार टिपणारा हा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये सुग्रीव कराड उमरी टोलनाक्यावर धमकी देत असल्याचा सांगण्यात येतंय. सुग्रीव आणि वाल्मिक कराडची तीन दिवसांपूर्वी एकत्रित कॉल रेकॉर्डिंग खासदार सोनवणे यांनी ऐकवली होती. खासदार सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणेला खूनाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता.
एकीकडे बीड जिल्हा कारागृह गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपी या कारागृहात बंदिस्त आहेत. अलीकडेच खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड यांची कथित ऑडिओ क्लिप ऐकवली होती. यात खासदार सोनवणे यांच्या मुलाला विलास घुले हत्या प्रकरणात अडकवण्याचा कट वाल्मीक कराडने कारागृहातून रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. या सर्व प्रकारानंतर छत्रपती संभाजी नगर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या पथकाने बीड कारागृहाची सात तास झडती घेतलेली. डीआयजी योगेश देसाई यांनी चौकशी करताना कारागृहातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवल्याची ही माहिती आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृहातील कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रारही केली होती. त्यामुळे हा सगळाच प्रकार अति संवेदनशील झाला आहे.
Before You Go
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं





















