एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळे आत्तापर्यंत तीनवेळा गावी येऊन गेला; सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचा खळबळजनक दावा

Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेआतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय.

Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) आतापर्यंत तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केलाय. कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचं सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, मात्र त्याला जेलबंद कसे करायचे याचा विचार गरजेचा आहे. आमच्या कुटुंबाला या आरोपी पासून धोका आहे. हे आरोपी शैतानी वृत्तीचे असून कृष्णा आंधळेला अटक करून त्याची दिंड जिल्हाभरात काढावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली. याच सुनावणी वेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिलीय.

दरम्यान, सुप्रीम कोर्टात येत्या 26 तारखेला वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. याबाबत कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी म्हटलं. मागील दीड वर्षांपासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचेही ते म्हणाले.

पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार, सुनावणीत आज नेमकं काय घडलं?

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. आजच्या (21 फेब्रुवारी) सुनावणीत आरोपी पक्षाला सर्व कागदपत्राची पूर्तता करा, अशा सूचना कोर्टाच्या वतीने सरकारी पक्षाला देण्यात आल्या आहे. आरोपी क्रमांक तीन ते सात यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बदलण्यात यावे यासाठी केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणे सादर केले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच विष्णू चाटेच्या जेल बदलीच्या अर्जावर आज ऑर्डर येण्याची शक्यता आहे. तर आरोपी जयराम चाटेकडून वकील बदलला आहे. नवीन वकील एम के वाघीरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारी पक्षाकडून एवढी घाई का?

दरम्यान, कोर्टाकडून प्रतीक घुलेला विचारणा करण्यात आली कि, वकील लावायचा आहे का? यावर प्रतीक घुलेकडून उत्तर देण्यात आलं आणिपुढील दहा ते पंधरा दिवसात घरचे लोक वकील बघतील असं सांगण्यात आलं. लॅपटॉपची क्लोन कॉफी मिळाली नाही, फॉरेन्सिकचा रिपोर्टही मिळाला नाही, पेन ड्राईव्ह मिळाला नाही. या सर्व गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय साक्षीदारांची लिस्ट स्वीकारू नये. असे म्हणत आरोपींच्या वकिलांची कोर्टाकडे विनंती केली आहे. तर सरकारी पक्षाकडून एवढी घाई का केली जात आहे. सरकारी पक्षाला दोषारोप पत्र एकदाच पूर्ण दाखल करायला सांगा. असे म्हणत आरोपी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी मागणी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ, चिंचा खाण्याच्या नादात दुर्घटना घडल्याचा संशय
धक्कादायक! बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ, चिंचा खाण्याच्या नादात दुर्घटना घडल्याचा संशय
Beed News : बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Beed News: बीडमधील गाडे कुटुंबाचा हृदयस्पर्शी निर्णय; अपघातात दगावलेल्या लेकाचा जिवंतपणा जपला, अवयवदानातून दुसऱ्याला जीवनदान
बीडमधील गाडे कुटुंबाचा हृदयस्पर्शी निर्णय; अपघातात दगावलेल्या लेकाचा जिवंतपणा जपला, अवयवदानातून दुसऱ्याला जीवनदान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget