एक्स्प्लोर

Beed Crime News: माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली? बाप-लेकाला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना

Beed Crime News: घरावर झालेल्या हल्ल्याची तक्रार पोलिसांत दिल्याचा राग मनात बाप-लेकाला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे.

Beed Crime News: बीड शहरातील पेठ बीड परिसरात घरावर झालेल्या हल्ल्याची तक्रार पोलिसांत दिल्याचा राग मनात धरून 66 वर्षीय सदाशिव कोकाट आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कोकाट यांना भररस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात (Beed Police Station) पाच जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News: आधी घरावर हल्ला, नंतर रस्त्यात मारहाण

11 फेब्रुवारी रोजी पेठ बीड भागात सदाशिव कोकाट यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. लाठ्या-काठ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले आणि विजयमाला कोकाट यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला होता. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात माझे नाव का टाकले, असा जाब विचारत पाच जणांनी सदाशिव कोकाट आणि त्यांच्या मुलाला रस्त्यात अडवून मारहाण केली आहे. 

Beed Crime News: “नाव काढून घे, नाहीतर 307 मध्ये अडकवू”

मारहाण करताना आरोपींनी “तू टाकलेल्या गुन्ह्यातून माझे नाव काढून घे, नाहीतर तुलाच 307 (खुनाचा प्रयत्न) मध्ये अडकवू,” अशी धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. दोन तरुणींसह पाच जणांनी अश्लील शिवीगाळ करत बाप-लेकाला बेदम मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित जमावातील काही जण “भैया, तो मरून जाईल रे… मारू नको,” अशी विनवणी करत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. तसेच “जर यांना कोणी नेलं तर सगळेच गुंतणार,” अशी धमकी तरुणींनी दिल्याचाही आरोप आहे.

Beed Crime News: तिघे जण जखमी; जिल्हा रुग्णालयात उपचार

दोन्ही घटनांमध्ये कोकाट कुटुंबातील तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न (कलम 307) आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपींना तात्काळ अटक न केल्यास ते आमच्यातील एखाद्याचा जीव घेतील, अशी भीती जखमींच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे बीड शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा 

Parbhani Crime News: बसमध्ये तिकीट काढण्यावरून किरकोळ वाद विकोपाला; कंडक्टरनं प्रवाश्याच्या डोक्यात तिकीट मशीन मारली अन्...; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
Beed Crime: सरपंच संतोष देशमुखांना हालहाल करुन मारणाऱ्या जयराम चाटेच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, तुरुंगाबाहेर पडताच काय घडलं?
संतोष देशमुखांना हालहाल करुन मारणाऱ्या जयराम चाटेच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, तुरुंगाबाहेर पडताच काय घडलं?
Beed Crime News: बाईक अडवून डोळ्यात मिरची पूड टाकली; कत्ती, लोखंडी रॉडने मारलं, बीडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?
बाईक अडवून डोळ्यात मिरची पूड टाकली; कत्ती, लोखंडी रॉडने मारलं, बीडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget