बीड: बीडच्या माजलगाव शहरात दोन बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न (Beed Crime News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालय, आंबेडकर चौक परिसरात घडली. लहान बहिणीने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला असून पोलिसांनी तात्काळ (Beed Crime News) कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भाग्यश्री हजारे यांच्या फिर्यादीवरून दिनेश पुरुषोत्तम देवकते (रा. येल्डा), मजहर सिकंदर सय्यद (रा. अंबाजोगाई), रवी बिभीषण निळे (रा. चौथाईवाडी, अंबाजोगाई) यांच्याविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Beed Crime News)

अंबाजोगाई येथील रहिवासी असलेल्या दोघी बहिणी परळी तालुक्यातील पोहनेर येथून माजलगावला आल्या होत्या. एक बहीण ही बीड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आजारी असल्यामुळे उपचारासाठी या दोन्ही बहिणी आपल्या मावसभावासोबत स्कुटीवरून माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात आल्या होत्या.(Beed Crime News)

दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर...

काल (सोमवारी, ता २३) दुपारी १२ च्या सुमारास दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर, बायपास परिसरात एका हूंह्याई औरा (एमएच १२ डब्ल्यूएक्स ४१६७) या चारचाकी वाहनाने त्यांना अडवले. या गाडीतील व्यक्तींनी दोन्ही बहिणींना जबरदस्तीने गाडीत ओढले आणि गाडी लॉक करून शहराच्या दिशेने वेगाने पळ काढला; परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या अनर्थाला वेळीच रोखण्यात यश आले.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव फसला 

दरम्यान, महाविद्यालय परिसरातून पुढे आंबेडकर चौकात आरोपींनी जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र लहान बहिणीने धाडस दाखवत मोठ्याने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी जमा झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव फसला आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महाविद्यालय परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

चारचाकी वाहनाने त्यांना अडवून गाडीत ओढण्याचा प्रयत्न

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात दोन बहिणींना जबरदस्तीने चारचाकीत बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालय आणि आंबेडकर चौक परिसरात हा प्रकार घडला. दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर बायपास भागात एका चारचाकी वाहनाने त्यांना अडवून गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी वाहन लॉक करून शहराच्या दिशेने वेगाने निघण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

मात्र आंबेडकर चौकाजवळ लहान बहिणीने प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरड केल्याने नागरिक तत्काळ जमा झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव फसला आणि संभाव्य अनर्थ टळला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले असून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.