एक्स्प्लोर

मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद! उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी 

Beed Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers)  मोठ्या संकटात सापडला आहे. कारण शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यावाचून करपू लागली आहेत.

Beed Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers)  मोठ्या संकटात सापडला आहे. कारण शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यावाचून करपू लागली आहेत. पावसाळा सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला तरीदेखील चांगला पाऊस पडला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात देखील आहे. पाऊस नसल्यामुळं उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुष्काळाचे सावट गडद होताना दिसत आहे. 

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी हतबल, चाऱ्याची तीव्र टंचाई 

बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले आहे. चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. आष्टी तालुक्यात काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकातच जनावरे सोडल्याचे चित्र आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. उभी पिके वाया गेल्याने आणि जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकातच आपली जनावरे सोडली आहेत. यावेळी एका हताश महिला शेतकऱ्याने जनावरांना चारा आणि पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न उपस्थित करत सरकारपर्यंत आपल्या व्यथा पोहोचवाव्यात अशी मागणी केली.

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, स्वतंत्र पॅकेज जाहीर करा : माजी आमदार भीमराव धोंडे

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून स्वतंत्र दुष्काळी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. जनावरांसाठी तातडीने चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, तसेच शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

पाऊस नाही पाणी नाही, हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला

गेल्या तीन महिन्यांपासून अहिल्यावगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे परिसरात अत्यंत भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. तालुक्यातील सोयाबीन, बाजरी, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि ऊस ही मुख्य पिके पाण्याअभावी पूर्णपणे धोक्यात आली आहेत. हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत आणि मदत जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. शेवगाव तालुक्यातील ही बिकट परिस्थिती पाहता, राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि जनावरांसाठी छावण्यांची सोय करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिसांत गुन्हा, नेमकं कारण काय?
धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिसांत गुन्हा, नेमकं कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget