Maratha Reservation : Beed : बीडमधील (Beed) माजलगावमध्ये (Majalgaon) आक्रमक मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Ajit Pawar Group MLA Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच, सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांनी जाळल्या. प्रकाश सोळंकेंनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. 


सोशल माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. साधारणतः दीड तास आंदोलकांकडून आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक सुरू होती. आंदोलकांनी सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या. प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यातून धुराचे लोळ येत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके घरातच उपस्थित होते. 


प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांची मोठी दगडफेक 


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. मागील एक तासापासून दगडफेक होत आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येत असल्याचं दिसत आहे. 


व्हायरल क्लिपमध्ये प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणालेत? 


एक मराठा आंदोलकानं आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. मुदतीचे 40 दिवस संपल्याची आठवण प्रकाश सोळंकेंना मराठा आंदोलकानं करुन दिली. त्यानंतर प्रकाश सोळंके म्हणाले की, "कोण म्हटलं सरकार आरक्षण देत नाही. 40 दिवस झाले म्हणून काय झालं? हे आरक्षण देऊन कोर्टात अडकवून ठेवायचं का परत? अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही, शासन देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे, एवढंच शासनाचं म्हणणं आहे. त्यादृष्टीनं जे काही आवश्यक आहे, ते सर्व शासन करतंय. शासनानं समिती नेमली आहे, त्या समितीचा अहवाल घेऊन शासन आरक्षण देणार आहे."


पाहा व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये पुढे काय म्हणाले आमदार प्रकाश सोळंके? 



महत्त्वाच्या इतर बातम्या :


अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांची एक तासापासून दगडफेक; सोळंकेंच्या बंगल्यामधून धुराचे लोळ