Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Adhik maas Vaan dhonda: जावयासाठी सोन्याची अंगठी असलेला धोंडा मांजरीने खाल्ला, जावयाला कपड्याच्या आहेरावर मानावे लागले समाधान

Adhik maas Vaan dhonda: सध्या अधिकमास सुरु आहे आणि या अधिकमासात (Adhik maas Vaan) जावयाचा मोठा मान असतो. प्रत्येक सासरा आपल्या जावयाला (Son in Law) वाण देताना सोन्याच्या (Gold) स्वरूपात काहीतरी वस्तू देत असतो. मात्र, बीडमध्ये आपल्या जावयासाठी केलेला धोंडा मांजरीने (Cat) खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. धोंड्याच्या (Dhonda) महिन्यासाठी आलेल्या जावयाला सरप्राईज देण्यासाठी अंगठी धोंड्यात ठेवून तो इतर धोंड्यांसोबत ठेवला. मात्र, स्वयंपाकानंतर आवराआवरी सुरू असताना घरात आलेल्या मांजरीने नेमका तोच धोंडा खाऊन टाकला, त्यामुळे घरच्यांची धांदल उडाली. (Beed Latest news)
माजलगाव येथील एका वस्तीवर 4 जून रोजी ही घटना घडली. गिळलेली अंगठी परत मिळावी म्हणून मांजरीला चक्क चार दिवस घरात बांधून ठेवण्यात आलं. विष्ठेतून ही अंगठी बाहेर पडेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने तिला पशुवैद्यकाकडे नेऊन उलटीसाठी औषधे देण्यात आले. परंतु मांजरीला उलटी झाली नाही उलट त्यात मांजरीचा जीव गेला. त्यानंतर मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया (Operation) करून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली. या विचित्र घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या विचित्र घटनेची जिल्हाभरात चर्चा होत आहे. मांजरीने अंगठी गिळल्यामुळे जावयाला वाणाच्या दिवशी आहेरासाठी आणलेल्या कपड्यांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र, मांजर मेल्यावर तिच्या पोटातील अंगठी बाहेर काढण्यात आली आहे. ही अंगठी जावयाला देण्यात आली की नाही, याबाबत कोणतीही माहिती नाही.
आणखी वाचा
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj






















