एक्स्प्लोर

Accident News : पंढरपूर महामार्गावर आलिशान कार थेट 300 फूट दरीत कोसळली; दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी बीडला हलवलं

Accident News : खामगाव-पंढरपूर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. आता आलिशान कार थेट 300 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.

Accident News : खामगाव-पंढरपूर महामार्गावर (Khamgaon-Pandharpur highway) अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी पुन्हा एकदा भीषण अपघाताची (Accident News) घटना घडली असून, एका आलिशान गाडीचा 300 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड (Beed) येथे उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना धारूर येथून परभणीकडे (Parbhani) निघालेल्या गाडीतील वाहन चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. धारूर घाटात (Dharur Ghat) असलेल्या म्हसोबा मंदिराजवळील तीव्र उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी थेट 300 फुट खोल दरीत कोसळली. या वाहनात भीमराव घायाळ आणि संदीप घायाळ हे दोघे प्रवासी होते.

दोघेही गंभीर जखमी, बीडला उपचारासाठी हलवले 

अपघातात दोघेही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोघांनाही तातडीने स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धारूर घाटात सुरक्षेसाठी कुठलीच व्यवस्था नसल्याने या ठिकाणी हे वारंवार अपघात होत आहेत. तसेच या घाटात काही ठिकाणी कव्हरेज नसल्याने देखील अपघात झाल्यावर वैद्यकीय सेवा भेटण्यास विलंब होतो. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

जुन्या वर्सोवा पुलावर भीषण अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पुलावर आज सोमवारी (दि. 23) दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव टँकर लोखंडी ग्रीलचा कठडा तोडून थेट खाडीत कोसळला. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून टँकर संपूर्णपणे पाण्यात बुडाला आहे.  हा टँकर वसईहून ठाण्याकडे निघाला होता. दरम्यान, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर टँकरने पुढे चाललेल्या लाकडांनी भरलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यानंतर गोंधळलेल्या टँकर चालकाने स्टेअरिंग वळवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट पुलावरून खाली खाडीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. टँकर उचलण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, पाण्यात पूर्ण बुडालेला टँकर बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 

आणखी वाचा

Bhiwandi Accident News : भिवंडीतील ठाणे बायपास रोडवर भीषण अपघात;कंटेनरच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget