Beed News : बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात उसाच्या शेतामध्ये खत देण्याचे काम करत असलेल्या बाप लेकाला विद्युत तारेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. या विद्युत तारेच्या जबर धक्क्यामध्ये पिता पुत्राचा मृत्यू झालाय.  अभिमान कबले आणि ज्ञानेश्वर कबले असे या दोघा बापलेकाचे नाव आहे. हे दोघेजण आपल्या शेतात काम करत असताना त्या ठिकाणी विद्युत तार खाली पडलेली होती. यात प्रवाह असल्याने दोघांनाही त्याचा शॉक लागला. ही घटना घडल्यानंतर त्या दोघांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. 

महावितरणच्या गलथानपणाचा फटका, बापलेकाला शॉक लागून मृत्यू

दरम्यान, महावितरणच्या गलथानपणाचा फटका आता या शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतामध्ये विद्युत तारा खाली आलेल्या असताना त्याची दुरुस्ती केली जात नाही. यामुळे असे अपघात होत आहेत. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जातेय.

केज तालुक्यात तरुणाचे अपहरण करत मारहाण, उपचार दरम्यान मृत्यू

अनैतिक संबंधातून अण्णा उर्फ ज्ञानेश्वर धपाटे यांचे अपहरण करत त्याला चक्क झाडाला बांधून त्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. बीडच्या केज तालुक्यातील भाटूंबा येथील या  मारहाणीच्या घटणेमध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर धपाटे याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तपासाअंती सत्य कळू शकणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे तब्बल 1 हजार हेक्टरहुन अधिक पिकांचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या तुफान पावसामुळे तब्बल 1 हजार हेक्टरहुन अधिक पिकांचे नुकसान कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजित अहवालनुसार जवळपास 1 हजार 248 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान यामध्ये प्रामुख्याने आंबा, केळी, कलिंगड, खरबूज या फळपिकासह भुईमूग, उडीद, उन्हाळी कांदा इत्यादी पिकांचे मोठे नुकसान सोलापूर जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनाम्याना सुरुवात कृषी आणि महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर आणि नुकसानस्थळी जाऊन प्रत्यक्ष पंचनामे सुरु आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या