Beed News बीड : पुलाची दिशा चुकल्याच्या कारणास्तव बीड मधील रेल्वे लोहमार्गावरील पावणेतीन कोटी रुपयांचा पूल अखेर पाडण्यात आला. अहिल्यानगर-बीड-परळी (Ahilyanagar-Beed-Parli) या रेल्वे मार्गाचे काम जवळपास 25 वर्षांपासून सुरू आहे. अहिल्यानगर ते राजुरी रेल्वे स्थानकापर्यंत यशस्वी रेल्वे चाचणी देखील पूर्ण झाली. यादरम्यान चर-हाटा रोडवरील पावणेतीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पूल दिशा चुकल्याच्या कारणास्तव पाडण्यात आला आहे.

दरम्यान, रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा प्लॅन आखला नव्हता का? असा सवाल उपस्थित केला जातोय. तर संबंधित अभियंता आणि ठेकेदार कंपनीवर प्रशासकीय कारवाई करून नुकसान भरपाई शासनाच्या तिजोरीत जमा करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय. मात्र या प्रकरणामुळे प्रशासनाच्या पावणेतीन कोटी रुपयांच्या अक्षरशः चुराडा झाला आहे.

बेशिस्त आणि अवैध रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मोहीम

बीड शहरात बेशिस्त आणि अवैध रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केलीय. जिल्ह्यासह शहरात दिवसभरात दहा हजाराच्या वर वाहने ये-जा करतात. त्यात रिक्षांची संख्या मोठी आहे. अनेक रिक्षा चालक विना कागदपत्रे रिक्षा चालवतात. या रिक्षा चालकांकडे कागदपत्रे परिपूर्ण स्वरूपात आहेत की नाही? याची शहानिशा करण्यासाठी वाहतूक शाखेकडून हीमोहीम सुरू करण्यात आलीय. यादरम्यान 40 रिक्षा चालकांवर कारवाई देखील करण्यात आली. या कारवाईत सातत्य राखणं गरजेच जेणेकरून अवैध रिक्षा चालकांवर जरब बसेल.

अजित पवार गटाच्या बरखास्त कार्यकारणीत सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सहा महिन्यानंतर बीडच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बीड, परळी, आष्टी आणि पाटोदा विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अजित पवार गटाची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. यादरम्यान वाल्मीक कराड आणि केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे गजाआड गेल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली. होणाऱ्या आरोपामुळे अजित पवारांनी स्वतः याची दखल घेत कार्यकारणी बरखास्त केली होती. आणि आज सहा महिन्यानंतर काही महत्त्वाच्या जागी पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र केज तालुकाध्यक्षपदी अद्याप कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही.

संबंधित बातमी: