Beed : आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, धामणगाव येथे शिक्षण घेत असलेल्या नम्रता राजू मुळे हिने आज दुर्दैवी प्रसंगातही शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. नम्रता मुळे (Namrata Mule) हिची आई साधना राजू मुळे यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. कुटुंबावर शोककळा पसरली असतानाही नम्रताने काळजावर दगड ठेऊन सकाळी साडेनऊ वाजता आईचा अंत्यविधी करून तासाभरातच इंदिरा माध्यमिक विद्यालय, धामणगाव (Dhamangaon) येथे सुरू असलेल्या दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर दिला.


डोळ्यांत अश्रू, आईचं छत्र हरवल्याचं दु:ख, तरिही जिद्द सोडली नाही


आईच्या अचानक निधनाने तिच्या डोळ्यांत अश्रू, मनात हळवेपणाचे काहूर आणि हातात परीक्षेचे पेपर यापेक्षा मोठे दु:ख कोणते असू शकते? एकीकडे परीक्षेचे दडपण, तर दुसरीकडे मातृछत्र हरवल्याचा आभाळासारखा मोठा आघात या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण आष्टी तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. 


मुळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर 


दरम्यान, मयत साधना मुळे यांना आज शनिवारी सकाळी उपचारासाठी अहिल्यानगर येथे दाखल करायचे होते. मात्र, काळाने त्यासाठी वेळ दिला नाही. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पती राजू मुळे, मुलगा यश मुळे (बारावी परीक्षा देत आहे), मुलगी नम्रता मुळे असा परिवार या कठीण प्रसंगातून जात आहे.


मुलीची शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आणि मानसिक धैर्य सर्वांसाठी प्रेरणादायी


नम्रता मुळे या दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलीच्या आईचे निधन झाल्याने या कठीण व दुःखद परिस्थितीत शिक्षण विभागाकडूनही मानसिक आधार देण्यात आला. आष्टीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव आणि केंद्र संचालक राजू गर्जे यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर भेट देऊन नम्रता मुळे या विद्यार्थ्यांनीचे सांत्वन केले व मानसिक आधार दिला. त्यांच्या मानसिक आधारामुळे ती परीक्षा देण्यास तयार झाली. या मुलीची शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आणि मानसिक धैर्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


युक्रेन-रशिया युद्धावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प भिडले असतानाच तिकडं एक युद्ध तरी थांबलं! हत्यारे ठेवली, वेगळ्या देशाच्या मागणीने गेल्या 40 वर्षात 40 हजार जणांचा जीव गेला


Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा


Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती