एक्स्प्लोर

Beed Accident: मृत्यूच्या दाढेतून एकदा बाहेर आले, पण नियतीने ठरल्याप्रमाणे शेवट केला अन् बीडचा गढी पूल सहा जणांच्या रक्ताने माखला

Beed Accident News : बीड जिल्ह्यातून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर एक भीषण अपघाताची (Accident News) घटना घडली आहे.

Beed Accident News : बीड जिल्ह्यासाठी आजची म्हणजेच मंगळवारची (27 मे) सकाळ एका अतिशय दुर्दैवी बातमीने उजाडली आहे. यात बीड जिल्ह्यातून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर एक भीषण अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. नियतीच्या या खेळात एका अपघातामधून बचावलेल्या सहा जणांना दुसऱ्याच क्षणात भरधाव ट्रकनं बेदरकारपणे अक्षरक्ष: चिरडलं (Accident) आहे. त्यामुळे एकदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या 6 मित्रांचा नियतीने अखेर ठरल्याप्रमाणेच शेवट केला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात (Beed Accident) एकच खळबळ उडाली आहे. मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाच्या बातमीने गेवराईवर शोककळा पसरली आहे. 

 ....अन् इथेच नियतीने घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

 पुढे आलेल्या माहिती नुसार, गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावरुन एका एसयूव्ही कार मधून सहा जण प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असल्याने गाडी भरधाव वेगाने जात होती. मात्र अचानक कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकली. यावेळी कारमधील काहींना किरकोळ मार बसला. मात्र कारचे काही प्रमाणात नुकसान झाले. अशातच डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले आणि इथेच नियतीने घात केला. या दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक देत अक्षरक्ष: चिरडत नेलं आणि यात त्या सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले  आहे. 

अशी आहेत मृतकांची नावे

बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झालाय. तसचे जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेत कारचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरुन फरार झाला आहे. त्यामुळे पोलीस या ट्रक चालकाचाही शोध घेत आहे. मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

About the author अजय माने

अजय माने
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
NEET Exam Paper Leak: मोठी बातमी: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा
Pavana River pollution: पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना पुन्हा ‘गटारगंगा’; नदीपात्रात रासायनिक फेसाचे साम्राज्य, सर्रास नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना पुन्हा ‘गटारगंगा’; नदीपात्रात रासायनिक फेसाचे साम्राज्य, सर्रास नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?
Mumbai Crime News: संशयाचे भूत ठरले जीवघेणे! पतीने पत्नीसमोरच काढला कथित प्रियकराचा काटा; मुंबईतील हादरवणारी घटना
संशयाचे भूत ठरले जीवघेणे! पतीने पत्नीसमोरच काढला कथित प्रियकराचा काटा; मुंबईतील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची अन्...; नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून मनीषा वाघमारेला उचचलं, मोबाईलमधील माहितीपासून बँक व्यवहारांपर्यंत चौकशी
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
LPG Price Hike: मोठी बातमी: पेट्रोल-डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरची किंमतही वाढणार?
Pune Hospital Bomb Case : हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरली, हडपसर, मांजरी परिसरात पोलिसांकडून कसून चौकशी; आरोपी अद्याप फरार
हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरली, हडपसर, मांजरी परिसरात पोलिसांकडून कसून चौकशी; आरोपी अद्याप फरार
Ambernath Nagar Parishad: अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
अंबरनाथमध्ये सेना-भाजप युतीवरून अंतर्गत धुसफूस; अवघ्या 24 तासांत नाराजी उघड! नेमकं काय घडलं?
Maharashtra Reservation Policy: स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतापले; म्हणाले, 'मागासवर्गीयांचे मंत्री...'
Monsoon Update : मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती, ईशान्य भारत, दक्षिणेतील राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता
मान्सून अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती, ईशान्य भारत, दक्षिणेतील राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता
Embed widget