एक्स्प्लोर

Bacchu Kadu Farmer Protest : शेतकरी आंदोलन संपताच सरकारकडून कारवाईचा वरवंटा, आंदोलकांवर गुन्हे दाखल, भाजप आमदाराकडून बच्चू कडूंच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

बेकायदेशीरपणे महामार्ग अडविले, नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिसांनी प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Bacchu Kadu : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu )  यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या नेतृत्वात नागपुरतील आंदोलनाला (Bacchu Kadu Farmer Protest) आता काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. तर दुसरीकडे शेतकरी आंदोलनादरम्यान नागपुरकरांसह हजारो नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास व मन:स्ताप सहन करावा लागला. बेकायदेशीरपणे महामार्ग अडविले, नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिसांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Bacchu Kadu Farmer Protest : आंदोलन संपताच कारवाईचा वरवंटा, विविध कलमांखाली गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या आसपास शेतकरी आंदोलक जामठ्याजवळ पोहोचले. त्यांना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्चजवळील मोकळ्या जागेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी त्याच्या दोन किमी अलीकडेच वर्धा मार्ग अडविला आणि जवळपास 30 तासांहून अधिक वेळ संपूर्ण महामार्गावर कोंडी होती. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. वाहनांमध्ये अडकलेल्यांना अन्न आणि पाण्यापासून वंचित रहावे लागले. परिणामी, न्यायालयाच्या निर्देशानंतर आंदोलक तेथून हटल्यानंतर हिंगणा पोलिसांनी अटींचे उल्लंघन करणे, बेकायदेशीरपणे जमून नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे आणि वाहतुकीत अडथळा आणणे यासारख्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

Pravin Tayade on Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, मुख्यमंत्र्यांना पत्र

तर दुसरीकडे, समाजसेवेचा बुरखा पांघरून 72 एकर परिसरात खंडणीच्या पैशातून उभारलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण तायडे (Pravin Tayade on Bacchu Kadu) यांनी केली आहे. सोबतच बच्चू कडू यांच्यावर पुन्हा एकदा काही खळबळजनक आरोप केले आहेत.

गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत. या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केलाय. त्या संदर्भात प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 November 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, 11 पोलीसांचा जागीच मृत्यू, तर 12 जण जखमी
पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, 11 पोलीसांचा जागीच मृत्यू, तर 12 जण जखमी
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget