Upcoming Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट सर्वात वेगाने वाढणारा विभाग ठरला आहे. ग्राहक आता अशा गाड्या पसंत करत आहेत ज्या बजेटमध्ये असतील, चांगला मायलेज देतील आणि गाड्यांमध्ये अनेक फीचर्स देखील असतील. येत्या काळात Maruti, Hyundai आणि Tata या कंपन्या या सेगमेंटमध्ये त्यांच्या नवीन गाड्या लाँच करणार आहेत. यामध्ये Maruti Fronx Hybrid, New Gen Hyundai Venue आणि Tata Punch Facelift यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात या गाड्यांचे फीचर्स आणि किंमती...
मारुती फ्रॉन्क्स हायब्रिड (Maruti Fronx Hybrid)
मारुती सुझुकीचा Fronx चं हायब्रिड व्हेरीएंत 2025 च्या शेवटी किंवा 2026 च्या सुरुवातीस लॉन्च होऊ शकते. यात 1.2 लिटर Z-सीरीज पेट्रोल इंजिनसोबत कंपनीचा स्ट्रॉन्ग हायब्रिड सिस्टम दिला जाईल, जो सीरीज हायब्रिड पॉवरट्रेनवर आधारित असेल. रिपोर्टनुसार, ही SUV 35 किमी/लिटर पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. डिझाइन सध्याच्या Fronx प्रमाणेच राहील, पण हायब्रिड बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरमुळे त्याचा परफॉर्मन्स अधिक सुधारेल. फीचर्समध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, LED हेडलॅम्प्स, 9-इंच टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, सनरूफ आणि स्टँडर्ड 6 एयरबॅग्स यांचा समावेश होऊ शकतो. याची अंदाजित किंमत 8 ते 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
ह्युंदाई व्हेन्यू (New Gen Hyundai Venue)
ह्युंदाई व्हेन्यूचे नवीन जनरेशन मॉडेल 2025 च्या शेवटी भारतीय बाजारात सादर केले जाणार आहे. यात नवीन डिझाइन, मोठी ग्रिल, स्पोर्टी बंपर आणि LED हेडलॅम्प्स असतील. इंजिन पर्यायांमध्ये 1.2 लिटर MPI पेट्रोल, 1.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल यांचा समावेश असेल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि DCT गिअरबॉक्ससह दिले जातील. इंटीरिअरमध्ये 10.25 इंचाचा टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, अंबरियंट लाईटिंग आणि लेदर अपहोल्स्ट्रीसारखे प्रीमियम फीचर्स असतील. सुरक्षेसाठी 6 एयरबॅग्स, ADAS लेवल-1 आणि हिल होल्ड कंट्रोल देखील दिला जाईल. याची अंदाजित किंमत 7 लाख 50 हजार ते 10 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
टाटा पंच फेसलिफ्ट (Tata Punch Facelift)
Tata Punch चा फेसलिफ्ट वर्जन 2025 मध्ये लॉन्च होणार आहे. यात समोरच्या डिझाइनमध्ये अपडेट होईल, ज्यामध्ये नवीन हेडलॅम्प्स, DRLs आणि बंपर यांचा समावेश असेल. इंजिन तेच राहील, 1.2-लीटर पेट्रोल यूनिट, जी 85 HP पॉवर देते आणि 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्ससह जोडलेली असेल. इंटीरियरमध्ये आता 10.25-इंचाचा टचस्क्रीन, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग आणि क्रूज कंट्रोलसारखे फीचर्स जोडले जातील. सुरक्षेसाठी Punch आधीच 5-स्टार Global NCAP रेटिंग मिळवलेले आहे. फेसलिफ्ट वर्जनमध्ये ESP आणि रेन सेंसिंग वायपर्स दिले जातील. याची अंदाजित किंमत 6 ते 9 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही बजेटमध्ये SUV विकत घेण्याचा विचार करत असाल, तर येत्या काळात तुमच्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध असतील. Maruti Fronx Hybrid सर्वाधिक मायलेज देणारी SUV असू शकते, Hyundai Venue 2025 प्रीमियम फीचर्स आणि ADAS सह सज्ज असेल, तर Tata Punch Facelift आपल्या अपडेटेड डिझाइन आणि 5-स्टार सुरक्षा पॅकेजसह लहान कुटुंबांसाठी परिपूर्ण ठरेल.
आणखी वाचा
Car loan Information:
Calculate Car Loan EMI