एक्स्प्लोर

Bike Riding Tips For Rain: पावसात दुचाकी चालवताय? अपघात टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Bike Riding Tips For Rain: भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Bike Riding Tips For Rain: भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत वाहन चालवणे खूप कठीण होऊन जाते. मुसळधार पावसाचा सामना करण्याबरोबरच वाहनचालकांना जोरदार वाऱ्याचाही सामना करावा लागतो. अशा हवामानात गाडी चालवताना खबरदारी घेतली पाहिजे. पावसाळ्यात रस्ते अपघातात वाढ होते, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी. पावसाळ्यात दुचाकी आणि स्कूटर चालवणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. रस्ते निसरडे झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढते. कधी कधी छोट्या चुकांमुळेही मोठा अपघात होतो. पावसाळ्यात रस्त्यावरील तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. 

वेग कमी ठेवा

पावसाळ्यात वेगाने गाडी चालवू नका. कारण पावसात रस्त्यावरील ट्रॅक्शन कमी होते, त्यामुळे तुमचे वाहनावरील नियंत्रणही कमी होते. मग ती बाईक असो वा स्कूटर. इतकेच नाही तर गाडी चालवताना अचानक ब्रेक लावल्याने ब्रेकही प्रभावीपणे लागत नाही. त्यामुळे पावसाळ्यात तुमच्या दुचाकीचा वेग ताशी 40 किलोमीटरपेक्षा कमी ठेवा.

रस्त्यावर पाणी भरले असेल तर थांबा

पावसाळ्यात ठिकठिकाणी रस्ते जलमय होतात. त्यामुळे अनेकवेळा रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले दिसत नाहीत. हा त्रास रात्रीच्या वेळी जास्त होतो. त्यामुळे जिथे पाणी भरले आहे, तिथे अजिबात गाडी चालवू नका.

हेल्मेट घालणे आवश्यक 

तुम्ही कुठे जवळ ही जात असाल तरीही हेल्मेटशिवाय बाईक किंवा स्कूटर कधीही चालवू नका. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात हेल्मेट घाला. पावसात हेल्मेटच्या व्हिझरमुळे पावसाचे थेंब डोळ्यांवर पडत नाहीत, त्यामुळे दुचाकी चालवणे सोपे जाते. तसेच हेल्मेट तुम्हाला सुरक्षित ठेवते.

गाडी चालवताना अंतर ठेवा 

पावसाळ्यात समोरच्या वाहनापासून नेहमी योग्य अंतर ठेवा. पावसात रस्त्यावर ट्रॅक्शन कमी होते, त्यामुळे योग्य वेळी ब्रेक लावला जात नाही. याशिवाय वाहनाचा हेडलाईट नेहमी चालू ठेवा.

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
Ranbir Kapoor :  'अॅनिमल' ते 'रामायण', तीन वर्षात रणबीरचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहा हैराण करणारे फोटो
'अॅनिमल' ते 'रामायण', तीन वर्षात रणबीरचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहा हैराण करणारे फोटो
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तरMurlidhar Mohol पुणेकर कर्ज रुपाने मत देतील, मी त्यांच्या अपेक्षा कामातून व्याजासहित पूर्ण करणारTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 25 एप्रिल  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9  AM : 25  April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
नाशिकच्या जागेवरून महायुतीत नवा ट्विस्ट, आता भाजपकडून थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात?
Ranbir Kapoor :  'अॅनिमल' ते 'रामायण', तीन वर्षात रणबीरचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहा हैराण करणारे फोटो
'अॅनिमल' ते 'रामायण', तीन वर्षात रणबीरचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; पाहा हैराण करणारे फोटो
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Embed widget