मुंबई : किया या आघाडीच्‍या मास प्रीमियम कारमेकरने आज त्‍यांचे लोकप्रिय उत्‍पादन कॅरेन्‍सच्‍या लाँचच्‍या ३६ महिन्‍यांमध्‍ये २ लाखाहून अधिक युनिट्सच्‍या विक्रीचा टप्‍पा गाठल्‍याची घोषणा केली. किया इंडियाची फॅमिली मूव्‍हर तिच्या श्रेणीमधील झपाट्याने विक्री होणारी व्हेईकल ठरली आहे, जेथे आरामदायीपणा, एैसपैस जागा, तंत्रज्ञान आणि स्‍टाइलच्‍या संयोजनाचा शोध घेणाऱ्या भारतातील कुटुंबामध्‍ये आपला दर्जा स्‍थापित करत आहे. व्‍यावहारिकता व प्रीमियम वैशिष्‍ट्यांचे प्रबळ संयोजन असलेली ही व्हेईकल वैविध्‍यता आणि वैशिष्‍ट्य-संपन्‍न गतीशीलता सोल्‍यूशन्‍सचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांशी संलग्‍न होत आहे.

Continues below advertisement


किया कॅरेन्‍सच्‍या लोकप्रियतेमधून तिच्‍या टॉप ट्रिम्‍ससाठी प्रबळ मागणी दिसून येते, ज्‍यांचे एकूण विक्रीमध्‍ये २४ टक्‍के योगदान आहे. सनरूफ, मल्‍टी-ड्राइव्‍ह मोड्स, हवेशीर सीट्स, किया कनेक्‍ट अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांनी विशेषत: या व्‍हेरिएण्‍ट्सना ग्राहकांमध्‍ये लोकप्रिय बनवले आहे. 


पॉवरट्रेन पसंतींच्‍या संदर्भात पेट्रोल व्‍हेरिएण्‍ट ५८ टक्‍के विक्रीसह अग्रस्‍थानी आहे, ज्‍यानंतर ४२ टक्‍के विक्रीसह डिझेल व्‍हेरिएण्‍टचा क्रमांक आहे. ३२ टक्‍के ग्राहक ऑटोमॅटिक व आयएमटीचा अवलंब करण्‍यासह दोन्‍ही ट्रान्‍समिशन पर्यायांमधून सहज ड्रायव्हिंग व सोयीसुविधा मिळतात. दुसरीकडे, २८ टक्‍के ग्राहकांनी सनरूफ असलेल्‍या व्‍हेरिएण्‍ट्सना प्राधान्‍य दिले आणि एकूण उत्‍पादन विक्रीपैकी ९५ टक्‍के विक्री ७-आसनी मॉडेल्‍समधून झाली, ज्‍यामुळे ही वास्‍तविक फॅमिली कार असल्‍याचे दिसून येते.


किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष हरदीप सिंग ब्रार म्‍हणाले, ''किया कॅरेन्‍सच्‍या यशामधून विश्‍वास व नाविन्‍यता दिसून येतात, ज्‍याला भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांबाबत आम्‍हाला असलेल्‍या सखोल माहितीचे पाठबळ मिळत आहे. प्रगत वैशिष्‍ट्ये, एैसपैस इंटीरिअर्स आणि तडजोड न करणारी सुरक्षितता यांसह कॅरेन्‍सने फॅमिली मूव्‍हर सेगमेंटला नव्‍या उंचीवर नेले आहे. २००,००० हून अधिक कुटुंबाचा विश्‍वास संपादित करत आणि सातत्‍यपूर्ण मासिक विक्रीसह या टप्‍प्‍यामधून कॅरेन्‍सची वाढती अपील दिसून येते. यामधून आम्‍हाला सर्वोत्तमतेसंदर्भातील मर्यादांना दूर करत राहण्‍यास आणि प्रत्‍येक प्रवास अधिक आरामदायी, कनेक्‍टेड व आनंददायी करणारी उत्‍पादने वितरित करत राहण्‍यास प्रे‍रणा मिळाली आहे.''


किया कॅरेन्‍सने बाजारपेठेत किया इंडियाचे स्‍थान प्रबळ करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशांतर्गत बाजारपेठेव्‍यतिरिक्‍त कॅरेन्‍सला आंतरराष्‍ट्रीय मान्‍यता देखील मिळाली आहे, जेथे ७० हून अधिक देशांमध्‍ये २४०६४ युनिट्स निर्यात करण्‍यात आले आहेत. या वाढत्‍या जागतिक मागणीमधून ग्राहकांच्‍या विविध गरजांना अनुसरून जागतिक दर्जाचे गतीशीलता सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याप्रती कियाची कटिबद्धता दिसून येते.


ही बातमी वाचा: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI