Manoj Jarange Patil Health Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली असून, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मागील दोन दिवसांपासून त्यांना ताप आणि थंडीचा त्रास होत असल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील यांना मागील दोन दिवसांपासून ताप आणि थंडीचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना 102 डिग्री ताप असून घशाचा त्रास तसेच टायफॉइडची लक्षणेही आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
Manoj Jarange Patil Health Update: पुढील चार दिवस पूर्ण आरामाचा सल्ला
मनोज जरांगे पाटील यांना पुढील चार दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी केली जात असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या संपूर्ण रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. रक्त तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची नेमकी स्थिती स्पष्ट होणार असून, त्यानुसार पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Manoj Jarange Patil Health Update: पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर प्रकृतीवर परिणाम?
मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी बैठका घेतल्या. या दौऱ्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. गावोगावी जाऊन त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. या काळात त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रवास झाला. रात्री उशिरापर्यंत बैठका आणि दौरे सुरू असल्याने त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. दीर्घ प्रवास, सततच्या बैठका आणि व्यस्त दौरा यामुळे अशक्तपणा जाणवू लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची नेमकी स्थिती रक्त तपासणीच्या अहवालानंतर अधिक स्पष्ट होणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
