एक्स्प्लोर

Marathwada: मराठवाड्यात प्रथमच राज्यस्तरीय 'कृषी प्रदर्शन'; कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार आयोजन

Agricultural Exhibition: आतापर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात होणारा कृषी प्रदर्शनाचे आयोजन यावेळी मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये करण्यात आले आहे.

Marathwada Agricultural Exhibition: कृषी विभागाकडून होणारे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन यावेळी औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात होणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या 1 जानेवारीपासून सिल्लोड तालुक्यात होणार आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भातील सोमवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. 

आतापर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात होणारा कृषी प्रदर्शनाचे आयोजन यावेळी मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, बियाणे तसेच शेतीपूरक व्यवसाय संबंधी मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ व तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर कृषी प्रदर्शन दिशा दर्शक ठरावा यासाठी अधिकारी-कर्मचारी व समनव्यक समितीच्या सदस्यांनी समनव्यातुन एक टीम म्हणून काम करावे असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

असा असणार राज्य कृषी प्रदर्शन...

औरंगाबाद येथील प्रदर्शनात 600 स्टॉल उभारण्यात येणार असून, या वेळी कृषितज्ज्ञांचे विविध विषयांवरील परिसंवाद, मार्गदर्शनपर व्याख्याने आदींचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत या महोत्सवात माहिती देण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत 5 ते 10 जानेवारी दरम्यान 'सिल्लोड महोत्सव' चे देखील आयोजन करण्यात येणार आहे. या  महोत्सवाची निर्धारित वेळेत तयारी पूर्ण करून कृषी महोत्सवाच्या सुयोग्य नियोजनासाठी प्रभावी उपाययोजना करा असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा...

नेहमी दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. नेहमी पारंपारिक पिकांमध्ये अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि पिकांची माहिती यावेळी मिळणार आहे. सोबतच कृषी क्षेत्रातील अनुभवी लोकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा कसा पाठींबा मिळतो हे देखील पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारच्या पाच महिन्याच्या काळात मराठवाड्यातील 475 शेतकऱ्यांची आत्महत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोलाAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : Bharatshet Gogawale यांच्याशी निवडणुकीच्या धामधुमीत गप्पाMahesh Sawant : माहीमच्या मुस्लिम समाजाचा मला पाठिंबा, महेश सावंतांचं वक्तव्य ABP MAJHAPratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Embed widget