महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावर एक कोटी खर्च करण्याऐवजी सैनिकी शाळा सुरु करावी; इम्तियाज जलील यांची मागणी
Maharana Pratap Statue Aurangabad : औरंगाबादमध्ये पुतळ्यावरुन राजकीय वाद रंगला आहे. शहरातील औरंगाबाद कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं आहे.

Maharana Pratap Statue Aurangabad : औरंगाबादमध्ये पुतळ्यावरुन राजकीय वाद रंगला आहे. शहरातील औरंगाबाद कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेना आणि एमआय एम या दोन पक्षांमध्ये यावरुन वाद पेटला आहे. एमआयएमने पुतळा उभारण्यास विरोध केला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत पालकमंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी रक्कम रु.90.00 लक्ष चे अंदाजपत्रक महानगरपालिका फंडातून मंजूर झालेले आहे. सदर काम सद्यस्थितीत निविदे प्रक्रियेत असल्याचे नमुद करण्यात आलेले आहे.
सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करा, असं मत एमआयएम खासदार खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे.
महाराणा प्रताप उदयपूर, मेवाड येथील शिशोदिया घराण्याचे महान राजा होते. त्यांच्या शौर्यामुळे आणि दृढनिश्चयामुळे नाव इतिहासाच्या पानावर अजरामर आहे. ते लहानपणा पासूनच शूर, निर्भय, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी होते. अनेक युध्दात त्यांनी पराक्रम दाखवुन शत्रुवर विजय प्राप्त केलेला आहे. अशा थोर महान शुरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारुन काहीही साध्य होणार नाही. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळा असेल; कारण त्यांच्या पासुन प्रेरणा घेवून ग्रामीण भागातील युवक व युवती सैनिक शाळामधुन देश संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतली. सबब सैनिक शाळा मधून सक्षम आणि प्रशिक्षित लष्करी अधिकारी घडविण्याचे काम केले जाई. सैनिक शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच तसेच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुध्दा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे जलील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live























