छत्रपती संभाजीनगर: गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील एक हजार ८६ शिक्षकांना मोठा दणका बसला आहे. मुख्यालयी न राहता काम करणाऱ्या शिक्षकांच्या वेतनवाढीवरच गंडांतर आलं आहे. या शिक्षकांची तीन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. गंगापूर आणि खुलताबाद (Chhatrapati Sambhajinagar) तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. मुख्यालयी राहण्याच्या सूचना देऊनही अनेक शिक्षकांनी त्याची पूर्तता केली नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. यानंतर शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांना नोटिसा बजावल्या. समाधानकारक (Chhatrapati Sambhajinagar) खुलासा न मिळाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. गंगापूरचे ७५३, तर खुलताबादचे ३३३ शिक्षक या कारवाईच्या कक्षेत आहेत. दरम्यान, शिक्षकांनी मुख्यालयी राहून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं अपेक्षित आहे, अशी भूमिका आमदार प्रशांत बंब यांनी घेतली आहे.आता या कारवाईनंतर शिक्षकांची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागलं आहे.(Chhatrapati Sambhajinagar)
गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल १ हजार ८६ शिक्षकांची एक वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्यात आली आहे. मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक व सहशिक्षकांवर मुख्यालयी राहत नसल्याचा ठपका ठेवत शिक्षकांनी केलेला खुलासा समाधानकारक नसून, तो अमान्य करण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ११) काढलेल्या आदेशात म्हटले आहे. यामुळे शिक्षकवर्गात एकच खळबळ उडाली आहे.(Chhatrapati Sambhajinagar)
जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तेसह शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब हे सातत्याने लावून धरत आहेत. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील शिक्षकांना तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहत असल्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींच्या ठरावाची पूर्तता करण्यासंबंधी नोटीस बजावल्या होत्या. परंतु, यानंतरही बहुतांश शिक्षकांनी ग्रामसभेचे ठराव सादर केलेले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीईओंनी ३० जून २०२२ रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र काढत एक वर्षाची वेतनवाढ का बंद करण्यात येऊ नये, अशी कारण दाखवा नोटीस बजावणे, अभिप्रायासह खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर मात्र गंगापूर तालुक्यातील ७५३ आणि खुलताबादेतील ३३३ शिक्षकांनी खुलासा सादर केला, परंतु, तो समाधानकारक नसल्याने अमान्य करण्यात आला.गेलेल्या या फाइलवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी विद्यमान सीईओंनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसारतत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन्ही तालुक्यांतील १ हजार ८६ शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ, तीन वर्षांकरिता तात्पुरत्या स्वरूपात रोखण्याची फाईल बाहेर काढली. अखेर या फाइलवर नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली आणि १ हजार ८६ शिक्षकांची एक वर्षाची वेतनवाढ तीन वर्षांकरिता रोखण्यात येत असल्याचे आदेश काढले.(Chhatrapati Sambhajinagar)
