एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना

.शेतकरी केवळ पीक वाचवण्यासाठी झगडत नाही, तर महिन्यांची मेहनत, शेतीवर झालेला खर्च आणि घरचं उद्याचं स्वप्न वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: पावसाळा आहे... पण मराठवाड्याच्या मातीत पाण्याऐवजी दुष्काळाच्या भेगा पडल्या आहेत. शिवारात पीक उभं आहे... पण त्यात जीव नाही. विहिरी आहेत... पण त्यात पाणी नाही. शेततळी आहेत... पण त्यात थेंब नाही. आणि गावात टँकर येतो, तेव्हा पाण्यासाठी माणसामाणसांत वाद होतो. हे चित्र एप्रिल-मे महिन्यातलं नाही, तर भर पावसाळ्यातलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात (Vaijapur) दुष्काळानं किती खोलवर पाय रोवलेत. (Drought)

पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड

वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. कधीकाळी याच मातीतून हिरवं पीक डोलायचं. आज मात्र जमिनीवर भेगा पडल्या आहेत आणि शिवारात वाळलेली फुलकोबी दिसत आहे. शेतकऱ्याने पिकाला पाणी मिळावं म्हणून ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. पाण्याची प्रत्येक धार जपण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र विहिरीतून शेतापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत मोटार बंद पडते. त्यामुळे पिकासाठी पाणी नाही आणि पाणी उपलब्ध असेल, तर ते पिकापर्यंत पोहोचवण्याचीही हमी नाही.शेतकरी केवळ पीक वाचवण्यासाठी झगडत नाही, तर महिन्यांची मेहनत, शेतीवर झालेला खर्च आणि घरचं उद्याचं स्वप्न वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे.

लोणीच्या शिवारात करपलेला मका

आता ड्रोन कॅमेऱ्यातून लोणी गावातील हे शिवार पाहा. नजर जाईल तिथपर्यंत मका दिसतो. मात्र हा हिरवा मका नाही, तर उन्हाने आणि पाण्याअभावी करपलेला मका आहे. शेतात कणीस दिसत नाही. दिसतात त्या फक्त वाळलेल्या चिपाट्या. या वाळलेल्या चिपाट्यांमधून चालताना येणारा आवाजही या संकटाची तीव्रता सांगतो.हा आवाज केवळ वाळलेल्या पिकाचा नाही, तर शेतकऱ्याच्या मोडलेल्या आशेचा आहे. ज्या पिकाकडून घर चालवण्याची अपेक्षा होती, तेच पीक आता जनावरांच्या चाऱ्यालाही उपयोगी पडेल की नाही, अशी अवस्था झाली आहे. शेत उभं आहे, पण त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा मावळली आहे.


Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना

 टँकरच्या पाण्यासाठी गावकऱ्यांमध्ये वाद

आता शिवारातून गावात येऊया. भर पावसाळ्यात टूनकी गावातील घरांसमोर पाण्याच्या टाक्या दिसत आहेत. पाऊस पडतोय, पण घरात पाणी नाही. त्यामुळे नागरिकांना टँकर येण्याची वाट पाहावी लागते. टँकर आला की प्रत्येकाला आपली टाकी भरून घ्यायची असते. मात्र टँकरचं पाणी मर्यादित आहे आणि तहान प्रत्येक घराची आहे. त्यामुळे कुणाच्या टाकीत किती पाणी भरायचं, टँकर अजून किती वेळ थांबणार, यावरून नागरिक आणि टँकर चालकांमध्ये बाचाबाची होते.आवाज वाढतो, वाद चिघळतो आणि एका नागरिकाच्या हातात दगड येतो. पाण्याचा एक टँकर आणि त्याभोवती जमलेली माणसं... या दृश्यातून दुष्काळाची खरी दाहकता दिसून येते. कारण पाणी जेव्हा जगण्याची गरज न राहता संघर्षाचं कारण बनतं, तेव्हा संकट किती गंभीर झालंय, याची कल्पना येते.


Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना

विहिरीचा तळ दिसतोय; विहिरीलाच टँकरचं पाणी

ही आहे लोणी गावातील विहीर. वरून पाहिलं तर ती विहीर वाटते. पण ड्रोन कॅमेरा खाली येतो आणि वास्तव समोर येतं. विहिरीचा तळ स्पष्ट दिसतोय. तळाशी थोडंसं पाणी आहे आणि त्या पाण्यावर शेतकऱ्याच्या पुढच्या दिवसांची आशा टिकून आहे. मात्र विहिरीच्या आजूबाजूला वाळलेलं शिवार आहे. ज्या विहिरीने पिकांना जगवलं, आज तीच विहीर स्वतः शेवटच्या थेंबांवर आली आहे.


Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना

सफियाबादवाडी आणि शिवूर परिसरात तर परिस्थिती आणखी अस्वस्थ करणारी आहे. विहिरीने तळ गाठला आहे. गुराढोरांची तहान भागवण्यासाठी टँकरमधून पाणी आणलं जातं आणि तेच पाणी विहिरीत ओतलं जातं. म्हणजे विहीर आता पाणी देत नाही, उलट विहिरीलाच पाणी द्यावं लागतंय.ही परिस्थिती एप्रिल-मेच्या अखेरीस येणारी. पण यंदा भर पावसाळ्यातच ही वेळ आली आहे. पावसाळा सुरू असताना विहिरीचा तळ दिसणं हा केवळ पाण्याचा प्रश्न नाही, तर निसर्गाच्या बदललेल्या चक्राची आणि गावकऱ्यांच्या वाढलेल्या असुरक्षिततेची धोक्याची घंटा आहे.

शेततळीही कोरडी; पाण्याची शेवटची आशाही आटली

शेतकऱ्याने पावसाचं पाणी साठवण्यासाठी शेततळं उभारलं. पावसाच्या प्रत्येक थेंबाला साठवण्याची तयारी केली. मात्र आज शेततळ्याचा तळ दिसतोय.पाणी साठवण्यासाठी केलेली व्यवस्था पाण्याअभावीच कोरडी पडली आहे. प्लास्टिकचं अस्तर खराब होऊ नये म्हणून त्यात थोडंफार पाणी ठेवण्याची वेळ आली आहे. शेततळं कोरडं पडणं म्हणजे शेतकऱ्याच्या हातातली पाण्याची शेवटची आशाही आटत चालल्याचं चित्र आहे.एरवी भर पावसाळ्यात शेतकऱ्याच्या शिवारात हिरवळ दिसायला हवी. विहिरी पाण्याने भरलेल्या असायला हव्यात. शेततळी ओसंडून वाहायला हवीत. पण वैजापूरमध्ये चित्र उलटं आहे.पाऊस आहे... पण पाणी नाही. पीक आहे... पण कणीस नाही. विहीर आहे... पण पाणी नाही. आणि गाव आहे... पण प्रत्येक घराची नजर टँकरच्या वाटेकडे आहे. भर पावसाळ्यात दिसणारं हे दुष्काळाचं चित्र उद्याच्या मोठ्या पाणी संकटाची चाहूल देत आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Shirsat: मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime News : मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
Nashik TCS Case News: बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश
बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Embed widget