Astrology Panchang 25 August 2024 : आज, रविवार 25 ऑगस्ट रोजी चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत जाणार आहे, त्यामुळे आज सनफा योग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी हल षष्ठी तिथीचे व्रत पाळलं जातं. या दिवशी ध्रुव योग, रवि योग आणि भरणी नक्षत्राचा शुभ योग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. मिथुन राशीचे लोक आज अनपेक्षित संपत्ती मिळवू शकतात. आज रविवारच्या सुट्टीचा लाभ व्यापाऱ्यांना मिळणार असून ग्राहकांच्या चांगल्या पाठिंब्यामुळे चांगला नफाही मिळणार आहे. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटाल. तुमचं घरगुती वातावरणही चांगलं राहील. प्रेम जीवनात असलेल्यांना आज रोमँटिक डिनरला जाण्याची संधी मिळेल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्येही वाढ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. दुकानदार आणि व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल आणि त्यांना व्यवसाय वाढवता येईल. आज जमीन आणि वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल.


तूळ रास (Libra)


आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी आशेचा नवा किरण घेऊन आला आहे. तूळ राशीच्या लोकांना आज सकाळपासून चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि तुमचं आरोग्यही सुधारेल. आज तुम्हाला नवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडेल. आज तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. नशिबाने साथ दिल्याने तुमच्या अडचणी दूर होतील आणि आर्थिक लाभाच्या अनेक चांगल्या संधीही मिळतील. आज घरातील वातावरण चांगलं राहील.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज त्यांच्या मुलांकडून किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोक रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतील आणि पुढच्या दिवसाचे नियोजनही करतील. आज तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करू शकता आणि कुटुंबातील सदस्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅझेट खरेदी करू शकता.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज कुंभ राशीच्या लोकांचं प्रेमळ वर्तन लोकांची मनं जिंकेल. आज तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने घरातील राहिलेली कामं पूर्ण करता येतील आणि आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर ती आज नक्कीच सुधारेल. आज तुम्ही तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 25 August 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य