Pakistani citizens who have come to India on visa : व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी देश सोडण्याची आज (27 एप्रिल) शेवटची तारीख आहे. केंद्र सरकारने अलिकडेच जारी केलेल्या सूचनांनुसार, ज्या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाची मुदत संपली आहे किंवा ज्यांचा दीर्घकालीन व्हिसा (LTV) अद्याप मंजूर झालेला नाही, त्यांना तत्काळ भारत सोडून पाकिस्तानात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतीय नातेवाईकांना भावनिक निरोप 

वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्यासाठी 29 एप्रिलपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे आज पाकिस्तानी नागरिक भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी-वाघा गेटवर पोहोचत आहेत. अनेक कुटुंबे त्यांचे सामान घेऊन रांगेत उभे असलेले दिसले. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांची संख्याही मोठी आहे. अनेक लोक त्यांच्या भारतीय नातेवाईकांना भावनिक निरोप देत आहेत.

सरकारी आदेशानुसार कारवाई सुरू  

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांनुसार, जे पाकिस्तानी नागरिक भारतात व्हिसा अटींचे उल्लंघन करत आहेत किंवा ज्यांची व्हिसा मुदतवाढ प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांना तत्काळ देश सोडावा लागेल. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस आणि इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. गुरुदासपूर, अमृतसर, फिरोजपूर आणि पंजाबच्या इतर सीमावर्ती जिल्ह्यांतील अनेक पाकिस्तानी नागरिकही आज सीमेवर रवाना झाले. परवानगीशिवाय कोणीही भारतात राहू नये म्हणून अधिकारी प्रत्येक ठिकाणी कागदपत्रे तपासत आहेत.

सीमेवरील भावनिक दृश्य

काल, शनिवारी, अनेक पाकिस्तानी नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की त्यांचे नातेवाईक, मित्र आणि त्यांच्या आयुष्यातील आठवणी भारतात आहेत. परतून जाण्याचं मन करत नाही, पण असहाय्य आहेत. पंजाब पोलिस प्रोटोकॉल अधिकारी अरुण कुमार यांच्या मते, काल, शनिवारी सुमारे 75 पाकिस्तानी नागरिक परतले. तर आतापर्यंत सुमारे 294 पाकिस्तानी नागरिक परतले आहेत आणि सुमारे 727 भारतीय नागरिकही परतले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या