अमरावती : 'ज्याचं लेकरू त्यांनीच बारसं करावं शेजारच्यांनी नाही', अशी टीका नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली. तर लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून हिरॉईन मटकून राहिली, असा घणाघात यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नवनीत राणांवर केलाय.  विकास कामाच्या मुद्द्यावरुन अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यामध्ये श्रेयवाद सुरु झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुकलेश्वर ते म्हेसपुर रस्त्याचे भूमिपूजन दोन दिवस अगोदर रात्रीच्या वेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. मात्र याच रस्त्याचे भूमिपूजन  खासदार नवनीत राणा  यांनी देखील केले. 


 अर्थसंकल्प 2022 -23 अंतर्गत या रस्त्याचे काम करत असल्याचा आशय खासदार नवनीत राणा यांच्या भूमिपूजनेच्या फलकावर आहे. तसेच  2023 -24 अर्थ संकल्पाअंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचा उल्लेख यशोमती ठाकूर यांच्या भूमिपूजनाच्या फलकावर नमूद करण्यात आले आहे. तसेच यावेळी या दोघींनी भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या वेळी एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. 


नवनीत राणांनी काय म्हटलं?


नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधत टीका केली. त्यांनी म्हटलं की, ज्याचं लेकरु त्यांनीच बारसं करावं,  करावं शेजारच्यांनी नाही. नणंदबाई आहे त्यांना झेलावच लागतं, असा टोला देखील नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला. यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यामध्ये अनेकदा अनेक मुद्द्यांवर घमासान होत असल्याचं पाहायला मिळातं. यावेळी देखील रस्त्याच्या कामाच्या श्रेयवादावरुन ही लढाई झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावतीमधील दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये वाद पाहायला मिळाला. 


यशोमती ठाकूरांचा पलटवार


खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी देखील प्रत्यु्त्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुका आल्या आहेत, त्यामुळे हिरोइन मटकून राहिली, गोरी आहे चांगला डान्स करते पण काम नाही असा जोरदार टोला यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा लगावला.


अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Lok Sabha Constituency) सध्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana)  यांचा बोलबाला आहे. खासदार नवनीत राणा ह्या 2019 मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. पण त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय चित्र पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


ही बातमी वाचा : 


Bacchu Kadu : आमची पार्टी जरी दोन आमदारांची, तरी मी एकटाच शंभर आमदारांना पुरेसा; बच्चू कडूंची तुफान फटकेबाजी