Amravati News :अमरावती जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. वरुड तालुक्यातील पुसली धरणात ही दुर्दैवी घटना घडली आहे. तीन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्यानं संपूर्ण वरुड तालुक्यात शोककळा पसरली आहे. 

Continues below advertisement

मृतांमध्ये दोन मुलं एक मुलगी 

दरम्यान, ही मुलं कालपासून बेपत्ता होती. कालपासून या मुलांचा शोध घेतला जात होता. आज दिनांक 18 मे च्या दुपारी पुसली धरणात या तिन्ही भावंडांचा मृतदेह आढळून आला आहे. वरुड तालुक्यातील शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सातनूर शेतशीवारात संतुलला उईके हे आपल्या कुटुंबंसाह मनोहर निमकर यांच्या शेतातील खोप्पडी वर रहातात. त्यांचे दोन मुलं एक मुलगी पंकज संतुलाल उईके (वय  10) प्रिया संतुलाल उईके (वय 8) पवन संतुलाल उईके (वय 7) अशी दोन मुलं एक मुलगी नरखेड येथील आश्रम शाळेत शिकतात. ते उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आई वडिलांकडे सातनूर येथे आले असता ते काल दिनांक 17 मे ला सकाळ पासून घरी परतले नाही. त्यानंतर संतुलाल उईके यांनी त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही. 

मुले मच्छी पकडण्यासाठी किंवा अंघोळ करण्यासाठी गेले असावे असा अंदाज

आज 18 मे च्या दुपारी बाजूला असणाऱ्या पुसली धरणात यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर या घटनेची माहिती शेंदुर्जना घाट पोलिसांना देण्यात आली. प्राथमिक अंदाज नुसार हे दोन मुलं 1 मुलगी, सातनूर गावांनाजिक असणाऱ्या पुसली धरणात मच्छी पकडण्यासाठी किंवा अंघोळ करण्यासाठी गेले असावे असे बोलले जात आहे.

Continues below advertisement

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात धक्कादायक घटना, दोन चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बोरगाव चिखली येथे दोन चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत झालेले दोघेही चुलच भाऊ होते. दर्शन जगदीश भोये ( वय 4 ) , तन्मय निलेश भोये ( वय 3 ) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. 

घर बांधकामासाठी खोदलेल्या पाणी साठवण खड्यात पडल्याने दोघांचा मृत्यू

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव जवळील चिखली येथे हौदात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ही लहान मुले घराजवळ खेळत असताना जवळच घर बांधकामासाठी खोदलेल्या पाणी साठवण खड्यात पडल्याने दोन्ही बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मुले पाण्यात पडल्याचे लक्षात येताच तातडीने पाण्यातून काढून त्यांना उपचारासाठी बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता प्राथमिक अहवालानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. या दोन्ही  भावांवर चिखली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! खेळताना हौदात पडल्यानं दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, नाशिकच्या बोरगावमधील घटना, गावावर शोककळा