Navneet Rana : आम्ही डोक्यावर गोळ्या खाऊ पण कलमा कधीही वाचणार नाही, असं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलं. त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या. भाजप हा विचारावर चालणारा पक्ष आहे. आम्ही सर्वांसोबत आहोत. आमची विचारांची लढाई आहे. एक आमदार निवडून आणणे कठीण होते त्या जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार निवडून आल्याचे राणा म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील होते. 

Continues below advertisement


बकरी ईदच्या दिवशी गाईंची कत्तल केली नाही पाहिजे


व्यक्तीसाठी नाही तर विचारासाठी लढावं लागेल असेही नवनीत राणा म्हणाल्या. कमळासोबत भगवा लागला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. आम्ही डोक्यावर गोळ्या खाऊ पण कलमा कधीही वाचणार नाही. जो खुदको बडे समजते है इस जिले मे उनको लोगो ने घर बिठाया असे म्हणत राणा यांनी विरोधकांना टोला लगावला. बकरी ईदच्या दिवशी गाईंची कत्तल केली नाही पाहिजे असेही राणा म्हणाल्या. जेव्हा काँगेस होती तेव्हा ते चालले आता नाही असेही राणा म्हणाल्या. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नवनीत राणा यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या धमकीविषयी सविस्तर माहिती दिली होती. पाकिस्तानहून आलेल्या कॉलमध्ये धमकी दिली गेली होती की, “हमारे पास तुम्हारी पुरी जानकारी है, हिंदू शेरनी तू कुछ दिन की मेहमान है, तुझे खत्म कर देंगे, ना सिंदूर बचेगा ना सिंदूर लगाने वाली बचेंगी,” असे म्हटले गेले होते. तर अशाच प्रकारचे कॉल त्यांचे पती रवी राणा यांच्या मोबाईलवर देखील आल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणाची नोंद खार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस तपास सुरू आहे. पाकिस्तान को मालूम होना चाहिये, भारत पाकिस्तान का बाप है, और बाप रहेगा...' मी देखील एका माजी सैनीकाची मुलगी आहे. काही लोक पहलगामवरून घरी एसीत बसून दुःख व्यक्त करत आहे. दहशतवाद्यांनी विचारलं की, तुम्ही हिंदू आहे की मुसलमान आहे? मुसलमान आहे तर कलमा वाचा. आम्ही या देशासाठी आमचं रक्त देऊ, पण कलमा वाचणार नाही. जय श्रीरामचा नारा देऊ, तोंडात बंदुकीची नळी लावली तरी आम्ही कलमा म्हणणार नाही असेही त्या म्हणाल्या होत्या.


महत्वाच्या बातम्या:


अमरावतीत राणा-खोडके वाद पुन्हा चव्हाट्यावर; नवनीत राणा म्हणाल्या, महापौर भाजपचाच; तर युती होणं शक्यच नाही, संजय खोडकेंचा इशारा, म्हणाले...