अमरावती : राज्यात विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक (Amravati) कार्यक्रम जाहीर झला असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपाकडून बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात येत आहे. राज्यातील 5 पैकी दोन मतदारसंघ शिक्षक आमदारांसाठी असून तीन मतदारसंघ हे पदवीधरचे आहेत. त्यामध्ये, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात आज उमेदवारीचे अंतिम चित्र स्पष्ट झालं आहे. त्यात, पुण्यातूनही महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीने माघार घेतली. तर, अमरावती येथेही महायुतीतून (Mahayuti) तीन बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. 

Continues below advertisement

अमरावती शिक्षक मतदारसंघातून पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज चव्हाण, रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती रेवने आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेचे नितीन आगे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे, महायुतीकडून शिवसेनेचीच उमेदवारी अंतिम झाली आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार सजील खान यांनीही आपाला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. 

अमरावती शिक्षक मतदार संघ महायुतीतून शिवसेना (शिंदे) विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर शिवसेना ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे, येथील मतदारसंघात तिहेरी लढत निश्चित मानली जाते. महायुतीकडून शिवसेना उमेदवार किरण सरनाईक हे फायनल आहेत. 

Continues below advertisement

अमरावतीत महायुतीतील हे उमेदवार बंडखोरीवर कायम

1) संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी) 2) शेखर भोयर (भाजप, आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे.)3) श्रीकांत देशपांडे माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी4)सुमित पवार, भाजपा पदाधिकारी

पुण्यात मंगेश चिवटेंची माघार

दरम्यान, दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीमधील शिवसेनेच्या मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादीच्या प्रताप माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे, येथे भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत. मात्र, येथेही माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचे आव्हान भाजप महायुतीला आहे. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार जयंत आसगावकर हे उमेदवार असल्याने येथेही तिहेरी लढत मानली जाते. 

हेही वाचा

महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया