Ambadas Danve On Walmik Karad: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्याबाबत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. पुण्यात आज बाळकडू वस्त्रहरण व्यंगचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत. वाल्मिक कराड फरार होता तेव्हा त्यांने यातच लक्ष दिलं. मालमत्ता ट्रान्सफर केल्या गेल्या, असा खळबळजनक गौप्यस्फोट अंबादास दानवेंनी केला आहे. आम्ही राजीनामा पाहिजे, म्हणून भूमिका घेतोय, असंही अंबादास दानवेंनी सांगितले.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर काय म्हणाले?
मी झिशान सिद्दीकी यांना भेटलो. ते म्हटले तपास चुकीच्या दिशेने जातोय. सरकारने नव्याने तपास करावा. जर सत्यता असेल तर नेता बिल्डर कोण होता?, फोन का केला होता?, याचा तपास करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. दरम्यान, एसटी दरवाढीवरुनही अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. एसटीच्या काचा निट नाहीत. एसटीच्या सिट व्यवस्थीत नाही. खासगीकरणाला वाव द्यायचा का?, तोटा सहन केला पाहीजे. महाराष्ट्रात आज आंदोलन होतंय. भ्रष्टाचार झालाय हे मी आधीच सांगितलं आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.
वाल्मिक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज; विोरोधकांकडून गंभीर आरोप
बीड जिल्हा रुग्णालयात दोन दिवस मुक्काम करुन उपचार घेतल्यानंतर वाल्मिक कराड याला शनिवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्याची रवानगी पुन्हा एकदा जिल्हा कारागृहात करण्यात आली. वाल्मिक कराड याच्यावर सरपंच देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी अशा दोन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, मकोका लागल्याने वाल्मिक कराडची सुटका अवघड मानली जात आहे. परंतु, पोलिसांच्या ताब्यात असतानाही वाल्मिक कराड याला पूर्वीप्रमाणेच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.