Alka Yagnik rare hearing disorder: आपल्या सुमधूर आवाजातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे अलका याज्ञिक (Alka Yagnik). तिनं अलिकडेच आपण गंभीर आजाराशी झुंज देत असल्याची माहिती शेअर केली होती. गायिका हियरिंग डिसऑर्डर या आजाराशी झुंज देत आहे. तिनं अलिकडेच आपल्या गंभीर आजाराबद्दल (Health Update) अपडेट दिली आहे. तिनं 'अजूनही मी या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे' अशी माहिती दिली.  या आजाराची माहिती मिळताच, ती शक्यतो गर्दीपासून दूर राहत आहे.  दरम्यान, गायिकेला पद्म भूषणने सन्मानित करण्यात आले, तेव्हा अलका याज्ञिकची प्रचंड चर्चा झाली.  तिचा यथोचित सन्मान झाला असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली. 

Continues below advertisement

एनडीटीव्हीशी चर्चा करताना अलका याज्ञिकने या दुर्मिळ आजाराबाबत माहिती दिली. 'अजूनही मी हियरिंग डिसऑर्डर या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे.   या गंभीर आजारामुळे सिंगिंग असाइनमेंट स्वीकारता येत नाही आहे, असे  असूनही  मेलडी क्वीनने भारताचे तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान मिळल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली'. याची माहिती अलकाला तिच्या लेकीकडून मिळाली.  'माझ्या मुलीनं याची माहिती दिली.  हे ऐकून मला प्रचंड आनंद झाला. या सन्मानासाठी माझी निवड केल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानू इच्छित आहे', असं गायिका म्हणाली. 

 

Continues below advertisement

हा सन्मान आपल्या मिळेल, याची आधीपासून अपेक्षा होती का? या प्रश्नावर गायिका म्हणाली, 'खरं सांगायचं झाल्यास नाही.  हा सन्मान जेव्हा मिळतो, तेव्हा त्याचे स्वागतच केले जाते', असं अलका याज्ञिक म्हणाली.  2024 साली अलकाने आपल्याला झालेल्या दुर्मिळ आजाराबाबत माहिती दिली होती.   इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याची माहिती दिली होती.  'सेंसरी न्यूरल नर्व हियरिंग लॉस'  (श्रवणशक्तीमध्ये कमी)  या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे.  हा आजार व्हायरल इन्फेक्शनमुळे झाला असल्याचं गायिकेनं सांगितलं.

आपल्याला दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती मिळताच गायिकेला अचानक मोठा धक्का बसला. तिनं चाहत्यांना आपल्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.  तेव्हापासून  अलकाने कोणताही नवीन प्रोजेक्ट हाती घेतलेला नाही.  'संगीतकार अधुनमधून माझ्याशी संपर्क साधत असतात.. पण मला रेकॉर्ड करणे शक्य होत नाही', असंही अलका म्हणाली.