Akshay Kumar On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकतचं त्यांच्या पक्षातील नेत्यांना सिनेमासंदर्भात चुकीचे विधान न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आज 'सेल्फी' (Selfiee) सिनेमाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान अक्षय कुमारने पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 


अक्षय कुमार म्हणाला,"एखाद्या सिनेमासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे सिनेमासाठी सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ही बाब लक्षात घेतली आहे. रिलीजआधीच सिनेमाला विरोध होणं हे सिनेमाच्या दृष्टीने योग्य नाही. जर चांगल्या सिनेमांची निर्मिती होत असेल तर त्याला विरोध करण्याची गरज नाही. पण मोदींच्या सल्ल्यामुळे तरी हे चित्र बदलेल अशी आशा आहे". 


खिलाडी कुमारच्या 'सेल्फी'चा ट्रेलर आऊट!


बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारच्या आगामी 'सेल्फी' या सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात अक्षयसोबत इमरान हाशमीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना विनोद, थरार, नाट्यासह अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.


'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सेल्फी'


'सेल्फी' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा पुढील महिन्यात 23 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय आणि इमरानसह नुसरत भरुचादेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. राज मेहताने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 






'सेल्फी' हा राज मेहता दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, इमरान हाश्मी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो अक्षय कुमारचा खूप मोठा चाहता असणार आहे. अक्षय आणि इमरानसोबत या चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात नुसरत भरुचा इमरानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.




संबंधित बातम्या


Selfiee : खिलाडी कुमारच्या 'सेल्फी'चं मोशन पोस्टर आऊट; 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला