अकोला : अकोला महापालिकेत भाजपाने सत्ता राखली. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड करण्यात आली आहे. शारदा खेडकर प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका आहेत. शारदा खेडकर यांना 45 मते मिळाली तर ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांना 32 मत मिळाली आहेत. भाजपच्या (Mayor of Akola Municipal Corporation) शारदा खेडकर यांना भाजपच्या 38 नगरसेवकांसह शरद पवारांचे राष्ट्रवादीचे तीन अजित पवारांचे राष्ट्रवादीचा एक शिंदेंच्या शिवसेनेचा एक आणि दोन अपक्ष नगरसेवकाचा (Mayor of Akola Municipal Corporation) पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला. तर एमआयएमचे तीन नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिलेत. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा फोल ठरला आहे. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या साथीने महापालिकेवरील सत्ता राखली. भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय झाला आहे.(Mayor of Akola Municipal Corporation)

Continues below advertisement

शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहात राडा

अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहात राडा झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात राडा केला. एमआयएम आणि काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात एकमेकांसोबत शाब्दिक भिडले. भाजपचे शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला. दरम्यान, एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांसोबत भिडले. MIM चे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांसोबत वाद घातलाय. (Mayor of Akola Municipal Corporation) दरम्यान, भाजपच्या महापौरला 38 नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, आणि 2 अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा आहे. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला होता. दुसरीकडं एमआयएमचे 3 नगरसेवक ऐवेळी राहिले तटस्थ. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा फोल ठरला. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या साथीने महापालिकेवरील सत्ता राखली. भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय झाला आहे.(Mayor of Akola Municipal Corporation)

अकोला महापालिकेच्या उपमहापौ पदी भाजपाचे अमोल गोगे विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या आजाद खान यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही एमआयएम तटस्थ राहिली. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

Continues below advertisement

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा : 80बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38काँग्रेस : 21उबाठा : 06शिंदे सेना : 01अजित राष्ट्रवादी : 01शरद राष्ट्रवादी : 03वंचित : 05एमआयएम : 03अपक्ष : 02