(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Food Poisoning : शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा; अकोला मनपा शाळेतील धक्कादायक प्रकार
Akola School Students Food Poisoning : अकोल्यातील मनपा शाळेत 10 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
Akola News : अकोला शहरातील मनपाच्या शाळेत (Municipal School) विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून (Nutritional Food) विषबाधा (Food Poisoning) झाल्याची माहिती समोर आली आहे. पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 10 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोषण आहारातून विषबाधा 10 विद्यार्थ्यांना
अकोला शिवसेना वसाहतमधील शाळा क्रमांक 26 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मनपा शाळेतील 10 विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ झाल्यामुळे त्यांना अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मृत उंदराचे अवशेष सापडल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.
गंभीर आणि किळसवाणा प्रकार
अकोला मनपा शाळेतील गंभीर आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पोषण आहाराच्या खिचडीमध्ये मेलेल्या उंदराचे अवशेष सापडले. यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे. मृत उंदराचे अवशेष आढळलली खिचडी खाल्लेल्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 10 विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.
विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात
मनपा शाळेत पोषण आहारत खिचडी दिली जाते. खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, शालेय पोषण आहारात मंगळवारी दुपारी विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या खिचडीमध्ये मृत उंदराचे अवशेष सापडले आहेत. हीच खिचडी या विद्यार्थ्यांनी सेवन केली होती, ज्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्यावर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हलगर्जीपणा! विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ
मंगळवारी संध्याकाळी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. शालेय पोषण आहारात मृत उंदर सापडणे हे फार मोठा हलगर्जीपणा असून विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ केल्याचा प्रकार आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पालिका विभाग आणि शालेय शिक्षण विभाग या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई करतो, याकडे साऱ्यांचंलक्ष लागलं आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI