एक्स्प्लोर

Akola : अकोल्यात स्त्री रूग्णालयातील भ्रष्टाचार उघड, जिल्हा शल्यचिकित्सकासह तीन वरिष्ठ आरोग्य अधिकारी निलंबित

Akola Woman Hospital : अकोला जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचं उघड झाल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकावर निलंबनाची कारवाई केली.

अकोला : अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागातील 31 पदांच्या भरतीसाठीची निविदा प्रक्रिया भ्रष्ट मार्गाने पार पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून, तिघांवर विभागीय चौकशीचा बडगा उगारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून अकोला जिल्हा स्त्री रूग्णालय हे चांगल्या कामाममूळे सातत्याने अव्वल असलेले रूग्णालय आहे.

निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता आणि नियमबाह्य निर्णय

सदर प्रक्रिया 2024-25 या आर्थिक वर्षात पार पडली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागातील 31 पदं भरायची होती. ही पद बाह्य स्त्रोतांमार्फत त्रयस्थ संस्थांकडून कंत्राटी पद्धतीने भरायची होती. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. याची निविदा 19 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

निविदा भरायची शेवटची मुदत 29 जुलै 2024 होती. ही सर्व प्रक्रिया या विभागाच्या 'जेम पोर्टल'द्वारे पुर्ण करायची होती. यामध्ये एकूण 72 निविदा प्राप्त झाल्या असताना, त्यातील फक्त 4 निविदांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आलं. विशेष म्हणजे फक्त दोन निविदांनाच अधिकृत मंजुरी देण्यात आली आणि त्या दोघांनाही ठेका देण्यात आला.

या संपूर्ण प्रक्रियेत अपारदर्शकता, पक्षपातीपणा आणि नियमानुसार तांत्रिक परीक्षण न करता निर्णय घेण्यात आल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यात या तिघांनी लाखो रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार श्याम खोडे यांनी केला होता.

विधानसभेत मुद्दा उपस्थित

या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटलेत. वाशिमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत "आपल्या मर्जीतील लोकांना ठेका देण्यासाठी प्रक्रिया हाताळली गेली" असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर शासनस्तरावरून तातडीने चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

चौकशी अहवालात भ्रष्टाचार सिद्ध

नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालात निविदा प्रक्रिया नियमानुसार न राबवणे, निविदा अपात्र ठरवताना कारणांची स्पष्ट नोंद न ठेवणे, आणि निवडक ठेकेदारांना लाभ मिळेल अशा पद्धतीने निर्णय घेणे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्य विभागात खळबळ

एकाच वेळी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने अकोल्याच्या आरोग्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे आरोग्य खात्यातील अन्य प्रक्रिया कितपत पारदर्शक आहेत, याबाबत देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रकरणाचा अधिक तपास सुरू

निलंबनानंतर तिघांवर विभागीय चौकशी होणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास पुढील कठोर कारवाईही केली जाऊ शकते, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Nagpur Crime: सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार
सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget