Akola : अकोल्यात हाय व्होल्टेज पॉलिटिक्स; भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीयांची आता आंबेडकरांना गळ, महापौर निवडणुकीत ट्विस्ट येणार
Akola Election : अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली होती. त्यानंतर काँग्रेसनेही ठाकरे गटाला मोठा प्रस्ताव दिला आहे.

अकोला : सर्वात मोठा पक्ष असला तरी अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी आता 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' रंगत असल्याचं दिसतंय. अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. अकोल्यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे 38 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 41 नगरसेवकांची गरज आहे.
आमदार साजिद खान आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात बंद दाराआड ही बैठक झाली. या बैठकीत एमआयएम आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. काँग्रेसने ठाकरे गटाला मोठा प्रस्ताव दिला होता. एकंदरीत 21 नगरसेवक असलेली काँग्रेस म्हणते आम्हाला कुठलंचं पद नकोय, भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येत यावं, अन् अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करावी.
काँग्रेस-वंचितमध्ये 45 मिनिटांची बोलणी
तशाच विनंतीसाठी पाच नगरसेवक असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागण्यासाठी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण हे अकोल्यातल्या आंबेडकरांच्या निवासस्थानी दाखल झाले. आमदार साजिद खान यांनी प्रकाश आंबेडकरांशी तब्बलं 45 मिनिट बंद दाराआड बोलणी केली.
अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला 'ऑफर' दिली होती. त्यानंतर काँग्रेसनेही ठाकरे गटाला मोठा प्रस्ताव दिला आणि आता आंबेडकरांना पाठिंबा देण्याची विनंती केली.
दरम्यान, 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. दुसरीकडे काँग्रेसचे 21, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेत महत्त्वाची आणि 'किंगमेकर'ची वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेची भूमिका आहे.
अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
- भाजप : 38
- काँग्रेस : 21
- उबाठा : 06
- शिंदे सेना : 01
- अजित राष्ट्रवादी : 01
- शरद राष्ट्रवादी : 03
- वंचित : 05
- एमआयएम : 03
- अपक्ष : 02
बैठकीत उपस्थित असलेले नेते
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि नगरसेवक रफिक सिद्धिकी, एमएमआयचे पदाधिकारी सैय्यद मोसीम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा असलेल्या एकमेक विजयी झालेले नगसेवक पती फयाज खान उपस्थित होते.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
महत्त्वाच्या बातम्या























