एक्स्प्लोर

भयावह! अकोल्यातील मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक पोलीसांचं अक्षरश: दुर्लक्ष

Akola News: अकोल्यात एका मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ (VIDEO) समोर आलाय.

Akola News: अकोल्यात एका मालवाहू वाहनासह ट्रॅक्टरमधील शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ (VIDEO) समोर आलाय. यात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या चिंतेचा विषय बनला असतानाच आता अकोल्यात प्रमुख रस्त्यावर शेतमजुरांचा हा जीवघेणा प्रवास सुरुये. असुरक्षित वाहनांतून शेकडो शेतमजूरांचा दररोज हा जीवघेणा प्रवास सुरूये. अकोल्यातल्या अकोट तालुक्यातल्या पणज आणि रुईखेड मार्गावर दररोज शेतमजुर असा हा धोकादायक प्रवास करताना सर्रास दिसून येतोय. ही घटना म्हणजे अपघाताला आमंत्रण देणारी ठरत असून व्हिडिओ समोर आल्याने यावर वेळीच योग्य ती दखल घेण्यात यावी अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

क्षमतेपेक्षा अधिक शेतमजूर कोंबून जीवघेणा प्रवास

विशेष म्हणजे ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतातील साहित्य भरलेलं असतानाच त्यावर क्षमतेपेक्षा अधिक शेतमजूर कोंबून नेत असल्याचे video मधून स्पष्टपणे दिसत आहे. तर मालवाहून वाहनात देखील बसायला जागाही नसल्याचे चित्र बघावयास मिळतेय. मात्र, तरीही शेतमजूर वाहनात कोंबून नेल्या जात आहे. तर काही तरुण वाहनाच्या लोखंडी अँगलवर बसून प्रवास करतायेत. आपण पाहू शकता आज ही वाहने अपघातांना आमंत्रण देणारी ठरते आहेत. परंतु या वाहतुकीकडे स्थानिक वाहतूक पोलीसांचं अक्षरश: दुर्लक्ष होत आहे.

रोडगे पार्टी जिवावर बेतली, धमाशांच्या अचानक हल्ला

अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतलीय. रोडगेच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. तर अनेक जण यात जखमी झालेय. अकोल्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात रोडगे जेवणासाठी मोठ्या उत्साहात स्वयंपाक सुरू असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला चढविला. मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. रेश्मा आतिश पवार यांचा यात मृत्यू झाला आहे. 

मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा जागीच दुर्देवी मृत्यू 

दरम्यान, प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतात आयोजित रोडगे जेवणाच्या कार्यक्रमात अचानक मधमाश्यांनी हल्ल्या चढवला. तर मीरा राठोड आणि दोन लहान मुलांसह काही अन्य लोक जखमी झाले आहेत. काल (24 फेब्रुवारी) दुपारपासून रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती. रोडगेसाठी गोवऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले. मात्र, याच गोवऱ्याच्या धुरामुळे जवळील मधमाश्यांचे पोळे फूटले आणि मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला चढवला होता. परंतु मधमाशांच्या हल्ल्यात रेश्मा पवार यांचा जागीच दुर्देवी झालाय. तर जखमींवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार, निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार, निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
ICC T20 Rankings Update : संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?
संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Embed widget