एबीपी माझाच्या बातमीचा दणका, शिर्डीत भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री, प्रशासनाकडून छापेमारी सुरु
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई (Action by the Food and Drug Administration Department) सुरु आहे.
Shirdi News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई (Action by the Food and Drug Administration Department) सुरु आहे. अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईत आत्तापर्यंत प्रशासनाने कोट्यावधी रुपयांचा माल जप्त केला आहे. अशातच साईबाबांच्या शिर्डीत (Saibaba Shirdi) देखील भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझाने (Abp Majha) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर प्रशासन कडबडून जागे झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने शिर्डीत छापेमारी केली आहे. साई मंदिर परिसरातील पेढा प्रसाद दुकानांवरून पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
प्रसाद दुकानांवरून पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात
एबीपी माझाच्या वृत्तानंतर अन्न व औषध प्रशासनाने शिर्डीत छापेमारी सुरु केली आहे. साई मंदिर परिसरातील पेढा प्रसाद दुकानांवरून पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. प्रसाद विक्रेते दोशी आढळल्यास कारवाई होणार आहे. गेल्या काही वेळापासून अन्न औषध प्रशासनाचे पथक शिर्डीत ठाण मांडून आहे. प्रसाद विक्रेत्यांच्या दुकानावर छापेमारी सुरु आहे.
दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत
साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू आहे.. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचं समोर आलं आहे. दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अनेक भाविक साई मंदिर परिसरात असणाऱ्या खाजगी दुकानदारांकडून प्रसाद विकत घेतात. मात्र या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट, तसेच हा पेढा नेमका कुठे आणि कोण बनवतो याबाबत उल्लेख नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसादाच्या नावाखाली साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाल आहे. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी असून श्रद्धेच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
साईबाबा संस्थानने मोठा निर्णय! राज्यातील 'या' विद्यार्थ्यांना मिळणार मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
महत्त्वाच्या बातम्या






















