अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभेचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक पार पडणार आहे. एकीकडे भाजपने अक्षय कर्डीले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने मविआतील संभ्रम कायम आहे. .त्यातच अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना मविआत काही समन्वय दिसत नाही. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळं मविआत राहुरीच्या जागेवरुन समन्वय नसल्याचं पाहायला मिळतंय. वंचित बहुजन आघाडीनं राहुरीतून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  

मविआत कोणता पक्ष उमेदवार देणार? 

मविआतील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत... त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तर, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी "राहुरीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ" असं म्हंटल्याने काँग्रेस देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिलेत. राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढणार की अपक्ष लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार?

शनिवारी अहिल्यानगरच्या राष्ट्रवादी भवनात झालेल्या पदाधिकारी बैठकीला प्राजक्त तनपुरे उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय... सोबतच  तनपुरे हे अपक्ष उमेदवारी करतील अशी मतदारसंघात चर्चा सुरू आहे, त्या चर्चेला पदाधिकारी बैठकीत त्यांच्या अनुपस्थितीने बळ मिळाले आहे... बैठकीनंतर राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, "मी तनपुरे यांच्या संपर्कात आहे, योग्य वेळी योग्य डाव टाकू" असं म्हंटलंय...मात्र तनपुरे यांनी वेगळा निर्णय घेतल्यास ठाकरे गट आणि काँग्रेस निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने राहुरीत महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? अशी राजकिय चर्चा सुरू झालीये.

संभाव्य उमेदवार / फिक्स उमेदवार

भाजप-अक्षय कर्डीले,भाजपराष्ट्रवादी SP / अपक्ष - प्राजक्त तनपुरेशिवसेना ठाकरे- रावसाहेब खेवरे , माजी जिल्हा प्रमुखकाँग्रेस -  बाळासाहेब आढाव , तालुका अध्यक्ष  / साहेबराव म्हसे, माजी बाजार समिती सदस्यएआयएमआयएम - डॉ.परवेज असरफी, जिल्हा अध्यक्षअपक्ष- गोविंद मोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य (कर्डीलेंचे कट्टर विरोधक)वंचित बहुजन आघाडी : अनिल जाधव