OBC Mahaelgar Melava अहमदनगर : येथील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर आज (दि. 03) ओबीसींचा महाएल्गार मेळावा (OBC Mahaelgar Melava) दुपारी तीन वाजता पार पडत आहे. या मेळाव्यात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी यंदा विधीमंडळावर ओबीसींचा भंडारा उधळणार आहे. त्यानंतर पुन्हा कधीच गुलाल उधळणार नाही. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) जरांगेंची फसवणूक केली की, मराठा समाजाची याचे उत्तर द्यावे, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.


प्रकाश शेंडगे म्हणाले की, अहमदनगर (Ahmednagar) नव्हे अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) सभा होत आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यानगर असे नामकरण करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी करावी. जरांगेंचे उपोषण सुटले आणि गुलाल पडला. हा तिसरा गुलाल होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला मागास ठरविले. गायकवाड समितीचा बोगस अहवाल घेतला आणि आरक्षण दिले तेव्हा गुलाल उडाला. 


अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कॅबिनेटमध्ये करा


यंदा विधीमंडळावर ओबीसींचा (OBC) भंडारा उधळणार आहे. त्यानंतर पुन्हा कधी गुलाल उधळणार नाही. आता हा गुलाल झटकन्याचे काम करायचे आहे. महाराष्ट्र सरकारने जरांगेंची फसवणूक केली की मराठा समाजाची याचे उत्तर द्यावे. आता सर्वेक्षण सुरू आहे, खोटी माहिती दिली जात आहे. माहिती खोटी दिली तरी आधार कार्ड नंबर खरा दिला आहे. त्यात बँक खाते लिंक आहे. जी खोटी माहिती दिली त्यावर आणि लिहून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कॅबिनेटमध्ये करा, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी यावेळी केली आहे.


2024 मध्ये बहुजनांचे सरकार आणा


2024 ला संजय गायकवाडला लाथा घाला. 2024 मध्ये ओबीसी मुख्यमंत्री आणा. बहुजनांचे सरकार आणा. यांच्या घरात मुलं जन्माला आले तरी ते आमदार, खासदार होऊन जन्माला येतात.  मराठ्यांचा आता सरपंचही होणार नाही, आमदार खासदार तर दूरचीच गोष्ट आहे, असेदेखील प्रकाश शेंडगे यावेळी म्हणाले. 


सर्व निवडणुका जिंकायच्यात


आता एकही निवडणूक (Election) सोडायची नाही. सर्व आपण जिंकायच्या आहेत. बोगस कुणबी आरक्षण घेतले जात आहे. उद्या आपल्या दोन याचिकेवर सुनावणी होणार आहेत. न्यायालयातील लढाई, रस्त्यावरील आणि राजकीय अशा तीन लढाई आपल्याला लढायच्या आहेत, असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.


आणखी वाचा 


Sanjay Raut : "संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे"; कोर्टाने सुनावले खडेबोल