एक्स्प्लोर

Abhishek Kalamkar : अभिषेक कळमकर हे हनी ट्रॅपचे बळी, त्या महिलेने पुण्यातील युवकालाही फसवलं अन् पैसे उकळले; निलेश लंकेंचा दावा

Nilesh Lanke On Abhishek Kalamkar : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकरांविरोधात एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर : शरद पवार गटाचा शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याचे प्रकरण हे हनी ट्रॅप असल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे. ज्या महिलेने हे आरोप केले आहेत तिने या आधी पुण्यातील एका युवकासोबतही असाच प्रकार केला. त्याच्याकडून तडजोड करून काही रक्कम उकळल्याचा दावाही लंके यांनी केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सोबतच त्यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ देखील व्हायरल झालेत. त्यावर निलेश लकं यांनी प्रतिक्रिया दिली. 

निलेश लंके म्हणाले की, "हा संपूर्ण प्रकार हनी ट्रॅपचा आहे. अभिषेक कळमकरवर ज्या महिलेने आरोप केले आहेत त्या महिलेने पुणे जिल्ह्यात एका युवकाबाबत असाच एक प्रकार केला आहे. त्या प्रकरणात संबंधित युवकाकडून तडजोडनामा करून काही रक्कम देखील घेतली आहे." 

रोहित पवारांना सुरक्षा द्या

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवारांनी संशय व्यक्त केला. याबाबत बोलताना खा. निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली असून रोहित पवारांकडून ज्या पद्धतीने मांडणी केली आहे त्यावरून या अपघाताबाबत नक्कीच संशय येत असल्याचे लंके म्हणाले. सोबतच रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा मिळावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यावर बोलताना, एखादा व्यक्ती स्पष्ट वक्ता असला की त्याला समाजातील काही दुर्जनांकडून धोका असतो, त्यामुळे रोहित पवारांना सुरक्षा मिळायला हवी असं लंके म्हणाले. 

शरद पवारांनाच विचारून राज्यसभेचा निर्णय

राज्यसभेच्या एका जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. राज्यसभेच्या जागेबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या चर्चा सुरू असून राष्ट्रवादीला या चर्चेपासून दूर ठेवण्यात आल्याचे बोललं जात आहे. याबाबत खासदार निलेश लंके यांना विचारले असता ते म्हणाले की, "कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो पवार साहेबांना विचारात घेऊनच घेतला जातो. मधल्या काळात शरद पवार यांची तब्येत खराब असल्याने चर्चा झाली नसेल. मात्र निर्णय हा त्यांच्या विचारानेच होईल."

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली असल्याचे देखील बोललं जातं आहे. याबाबत खासदार निलेश लंके यांनी म्हटले की, अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका आणि झेडपीच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढवल्या. उमेदवारांना तुतारी चिन्हावर लढायचं की घड्याळाच्या चिन्हावर  लढायचं याबाबत आम्ही त्यांना चॉईस ठेवला होता. त्यामुळे एकत्र येण्याची चर्चा झाली होती."
बाईट- निलेश लंके, खासदार

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि कृषी करारामुळे शेतकरी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत खासदार निलेश लंके यांना विचारले असता ते म्हणाले की, "हा करार अतिशय चुकीचा आहे. या संदर्भात आम्ही येणाऱ्या अधिवेशनात नक्कीच बाजू मांडणार आहोत. या करारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे."

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
Crime News Sagar Moholkar: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Embed widget