Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत, 30 मे पासून प्रखर उन्हात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. देशात कुठेच झालं नाही, असं कठोर उपोषण करणार असल्याचं स्पष्ट करताना जरांगे-पाटील यांनी 'उष्माघातानं बळी गेल्यास त्याला सरकार जबाबदार असेल', असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीसाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या लोणी गावातून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Continues below advertisement

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यात चर्चा होणार

विखे पाटलांची आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यात चर्चा होणार आहे. उद्या दुपारी विखे पाटील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर विखे पाटील उद्या जरांगे पाटलांना भेटणार आहेत. जरांगे पाटलांच्या मनधरणीसाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. 

लो तर मेलो, कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका

काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषण केली होती. त्यानंतर, भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंना भेटायला आले होते. पण त्यानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातून उद्वेग आणि संताप दिसत होता. त्यातूनच त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, 'मी येत्या 30 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. देशात कुठेच असं झालं नसेल असं उपोषण होणार आहे. मागच्यावेळी उपोषण करताना मंडप टाकला होता. यावेळी मंडप टाकला जाणार नाही. मी सावलीत बसून उपोषण करणार नाही. असाच जाऊन बसणार आहे. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात मी बसणार आहे. मेलो तर मेलो. कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका', असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. र्चेसाठी वेळ दिला आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. उष्माघातानं बळी गेला तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार जबाबदार असेल. सरकारचा नाहीतर माझा तुकडा पडेल. सरकारला आता वेळ तरी किती देऊ? उपोषणात पाणी, अन्न, चप्पल साऱ्या गोष्टींचा त्याग करणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. 

Continues below advertisement