Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला राज्यात मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन करणार आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून EVM वर शंका उपस्थित केली जातेय. याचसंदर्भात अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 2 पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. अनामत रक्कम भरुन हे अर्ज दाखल केले आहेत.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि कोपरगाव विधानसभेचे पराभुत उमेदवार संदीप वर्पे यांनी EVM पडताळीसाठी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ सालीमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरुन केले अर्ज दाखल केला आहे. तनपुरे यांनी राहुरीतील 5 केंद्र तर वर्पे यांनी कोपरगावातील एका केंद्रावरील EVM पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहेत. एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये शुल्क भरले आहे. जनतेची भावना आणि EVM वर शंका असल्याने अर्ज दाखल केल्याची माहिती संदिप वर्पे यांनी दिली आहे.
शरद पवार गटाकडून कायदेशीर लढाई लढण्यात येणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या ईव्हीएमविरोधातील तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा शरद पवारांनी निर्णय घेतला आहे. राज्यपातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. शरद पवारांकडून केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
EVM चे निकाल मान्य नाहीत, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ठाकरे गटाची मागणी
गेल्या 10 वर्षांपासून आम्ही EVM बाबत प्रश्न उपस्थित करत आहोत. काँग्रेसचे सरकार असताना भाजपने प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही मोदीजींचे भाषण ऐका, ईव्हीएम ही देशाची फसवणूक आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. जेव्हा ईव्हीएम नसतील तेव्हा देशात भाजपला देशात 25 जागाही मिळणार नाहीत असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्राचे निकाल ज्या प्रकारे आले आहेत, हरियाणाचे निकाल ज्या प्रकारे आले आहेत ते आम्हाला मान्य नाहीत, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जे निकाल येतील ते आम्ही स्वीकारू, असंही ते पुढे म्हणाले आहेत. जोपर्यंत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत आम्ही निकाल स्वीकारणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या: