अहिल्यानगर : एक दलित व्यक्ती देशाच्या सरन्यायाधीशपदी (CJI Bhushan Gavai) बसतो आणि त्याचाच राग धर्मांध लोकांना आहे. सनातनी धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत त्यांच्या दिशेने बूट भिरकावला जातो. पण त्यावर पोलीस काहीही कारवाई करत नाहीत हे दुर्दैवी असल्याचं मत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी व्यक्त केलं. गांधींना मारल्यानंतर हिंदू-मुस्लिम दंगल व्हावी म्हणून नथूरामने तो मुस्लिम असल्याचं सांगितलं होतं असंही ओवैसी म्हणाले. अहिल्यागरमध्ये पक्षाच्या मेळाव्यात असदुद्दीन ओवैसी बोलत होते.
जे लोक आता आपल्यावर अन्याय करत आहेत, त्यांचा अल्लाह प्रतिशोध घेईल, त्यांना धडा शिकवेल. आपल्याला काहीच करायची गरज नसल्याचं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. 'आय लव्ह मोहम्मद' म्हणणाऱ्यांनी त्या प्रमाणे वर्तनही करावं असं आवाहनही औवैसींनी केलं.
Asaduddin Owaisi Speech : दलित व्यक्ती सरन्यायाधीश म्हणून यांना राग
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फिरकावलं जातं, पण पोलीस काहीही करत नाहीत. देशातील वकील त्या विरोधात आवाज उठवत नाहीत. एक दलित व्यक्ती सरन्यायाधीशपदावर असल्याने कुणी काहीही करत नाहीत. सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत एका म्हाताऱ्या व्यक्तीने सरन्यायाधीशांकडे बूट फिरकावलं. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपरिवर्तन केलं, त्यावेळी आताचे सरन्यायाधीश यांचे वडील त्यांच्यासोबत होते. एक दलित व्यक्ती सरन्यायाधीश झाला हे धर्मांध लोकांना सहन होत नाही."
Asaduddin Owaisi Ahilyanagar : गांधींना मारणाऱ्या गोडसेने मुस्लिम असल्याचं सांगितलं
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, "अहिल्यानगर शहर तीन लोकांनी ओळखलं जातं. नारायण आपटे, विष्णू करकरे, मदनलाल पाहावा यांच्यामुळे शहर ओळखलं जातं. महात्मा गांधी यांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यातील हे तीन आरोपी होते. यांचा संबंध हा नगर शहराशी आला होता. नारायण आपटे, विष्णू करकरे, मदनलाल पाहावा यांनी जेव्हा महात्मा गांधींची हत्या केली तेव्हा नथुराम गोडसेला पोलिसांनी पकडले. गोडसेंनी त्यावेळी पोलिसांना सांगितलं की तो मुस्लिम आहे. 80 वर्षाच्या गांधींना मारून हे स्वतः ला बहादूर समजायचे. अहिल्यानगर शहराची आणखी एक ओळख आहे. इथल्या जेलमध्ये जवाहरलाल नेहरू यांना ठेवलं होतं."
Asaduddin Owaisi On Marathwada Flood : संपूर्ण कर्जमाफी करा
मराठवाड्यात आलेल्या पुरावर बोलताना ओवैसी म्हणाले की, "महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. पण देवेंद्र फडणवीसांनी मोठं मोठे आकडे सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींप्रमाणेच खोटं बोलतात. खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे जाऊन बसले पाहिजे आणि राज्यातील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली पाहिजे."
Asaduddin Owaisi On Narendra Modi : मोदींचा निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, " पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची स्तुती करतात. मी त्यांचा निषेध करतो. नेतान्याहू याने 60 हजार लोकांचा खून केला. त्यामध्ये 20 बालके तर 20 हजार महिला आहेत. त्याने लाखो लोकांना बेघर केलं. अशा नेतृत्वाची तुम्ही स्तुकी करता?"
ही बातमी वाचा: