Ahmednagar reel news : सध्या डिजीटल युगात सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोणी काय करेल? हे सांगता येत नाही. अहमदनगरमध्ये रील बनवणाचं खुळं जीवघेणं बनलंय. (Ahmednagar reel news) अहमदनगरमध्ये एका तरुणाने फाशी घेताना रील बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्याला खरोखरचं फास बसलाय. या तरुणाची प्रकृती सध्या अतिशय गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात.. (Ahmednagar reel news)

"फाशी"चा  रील बनवताना एका युवकाला प्रत्यक्ष बसली फाशी

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासात अनेक तरुण-तरुणी जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करताना दिसतात. अशीच एक धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली असून, "फाशी"चा  रील बनवताना एका युवकाला प्रत्यक्ष फाशी बसली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तातडीने या युवकाला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे. मात्र त्याची प्रकृती गंभीर आहे. (Ahmednagar reel news

रील बनवणारा युवक नेपाळचा रहिवासी

प्रकाश बुडा असे या रील बनवणाऱ्या युवकाचे नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. तो सध्या जामखेड येथील एका हॉटेलमध्ये काम करत आहे. त्याने फाशी घेण्याचा बनाव करत स्वतःचे चित्रीकरण सुरू केले होते... मात्र, दोरी गळ्याला अडकली आणि तो शुद्ध हरपून फासावर लटकला...दरम्यान घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियातील हव्यासापोटी जीव धोकात घालू नये, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केलंय.(Ahmednagar reel news

दरम्यान, सध्या देशात रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालण्याचं आणि स्टंट वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्ससाठी तरुण-तरुणी जीव धोक्यात घालून शूट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नगरमधील ही घटना अशा रील बनवणाऱ्या तरुण-तरुणींचे डोळे उघडणारी आहे. त्यामुळे तरुण-तरुणींनी रील बनवताना आधी स्वत:च्या जीवाची काळजी घ्यावी. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन सर्व स्तरातून करण्यात येत आहे. (Ahmednagar reel news

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मोठी बातमी! भाडे न वाढवता सर्व लोकल AC करणार, मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलसाठी मास्टर प्लॅन सांगितला!

मोठी बातमी : तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!