Khasdar Nilesh Lanke Ahmednagar News : खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांना काल पारनेर शहरातील आंबेडकर चौकात मारहाण झाल्याप्रकरणी 12 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पारनेर पोलिसात भादवि कलम 307 आणि इतर कलमासह आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुल झावरे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राहुल झावरे यांच्या वाहनाची तोडफोड करत ज्यांना जबर मारहाण करण्यात आली. राहुल झावरे यांच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यानंतर त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी विजय औटी यांना लोकसभा निवडणुक प्रचारावेळी राहुल झावरे यांच्या वनकुटे गावातून हाकलून दिल्याचा राग मनात धरून झावरे यांना मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. राहुल झावरे हे खासदार निलेश लंके यांचे समर्थक आहेत तर आरोपी विजय औटी हे सुजय विखेंचे कट्टर समर्थक आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी काल पारनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले तर मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी लंके समर्थकांनी पारनेर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपी विजय औटी, नंदू औटी आणि इतर एकाला ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखक करण्याचे काम सुरू होते. राहुल झावरे यांना मारहाण केल्या प्रकरणी विजय औटी, नंदू औटी , प्रितेश पानमंद, अंकुश ठुबे ,निलेश घुमटकर, संगम सोनवणे ,नामदेव औटी , मंगेश कावरे , पवन औटी, प्रमोद रोहकले, प्रथमेश रोहकले, सुरेश औटी. आणि इतर 3 ते 4 अनोळखी व्यक्तींविरोधात पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शातंता राखा - निलेश लंके 


खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांना काल पारनेर शहरातील आंबेडकर चौकात मारहाण झाली होती...त्यानंतर पारनेमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान या घटनेचे पोलिसांनी वेळीच दखल घेत कारवाई केली चार जणांना ताब्यात घेतले असल्याचे म्हणत मी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करतो असं निलेश लंके यांनी म्हंटले आहे. मात्र येत्या काळात जिल्ह्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी काम करणार असल्याचे म्हणत मी सध्या जिल्ह्याचा पालक आहे त्यामुळे जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लंके यांनी म्हंटले तर 10 तारखेला अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होणार आहे, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा वर्धापनदिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी म्हंटले आहे.



पारनेरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात 


खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल झावरे यांना  पारनेर शहरातील आंबेडकर चौकात मारहाण झाली होती. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात 12 आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राहुल झावरे यांच्या वाहनाची तोडफोड करत ज्यांना जबर मारहाण करण्यात आली...राहुल झावरे यांच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यानंतर त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निलेश लंके यांचे कट्टर समर्थक असलेले राहुल झावरे यांना सुजय विखे यांचे कट्टर समर्थक असलेले विजय औटी आणि इतर 8 ते 10 जणांनी मारहाण केली होती. दरम्यान यानंतर पारनेरमध्ये तणाव वाढला होता...खासदार निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते...दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पारनेमध्ये पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आलाय.