अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी माघार घेतल्याने भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले आहेत.
Ahilyanagar Vidhan Parishad Election : अहिल्यानगर विधानपरिषदेच्या (Ahilyanagar Vidhan Parishad Election) जागेचा तिढा अखेर सुटला आहे. अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे (Dattatray Pansare) यांनी माघार घेतल्याने भाजपचे प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने पानसरेंनी माघार घेतली आहे. माघारीवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, प्राजक्त तनपुरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व अपक्ष उमेदवारांचे आभार मानले.
दत्तात्रय पानसरेंना आमदार करण्याचा विखे पाटलांनी दिला शब्द
महायुतीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यामध्ये योगदान दिल्याचे पालकमंत्र्यांनी वक्तव्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सर्व प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका होती असं पालकमंत्री विखेंनी म्हटलं. बराच वेळा आमच्या मतमतांतरे आणि समज गैरसमज असतात, त्याचबरोबर विरोधी पक्षाकडूनही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीची अवस्था पाहिल्यास त्यांनी सपशेल या निवडणुकीत लोटांगण घेतले आहे अशी अवस्था असं विखे म्हणाले. तर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या शब्दासाठी मी माघार घेतली असल्याचे दत्तात्रय पानसरे यांनी म्हटलं आहे. सोबतच मला पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की पुढच्यावेळी तुला आमदार करु, आता पाहुयात ते मला कधी आमदार करतात? असं दत्तात्रय पानसरे यांनी म्हटलं आहे.
मी सर्व अपक्ष उमेदवारांचा आभार मानतो त्यांनी मोठ्या मनाने माघार घेतली : प्राजक्त तनपुरे
मी सर्व अपक्ष उमेदवारांचा आभार मानतो त्यांनी मोठ्या मनाने माघार घेतल्याचे प्राजक्त तनपुरे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांनी मोठ्या विश्वासाने मला उमेदवारी दिली आहे. सर्व प्रश्न सोडवण्याचा मी महानगरपालिका आणि पालिकेच्या सर्व नगरसेवकांना विश्वास देतो. माझ्या राजकारणाची सुरुवात देखील नगराध्यक्ष म्हणून झाली, राज्यात राज्यमंत्रीपद देखील भूषवल्याचे तनपुरे म्हणाले. विधान परिषदेत मी प्रश्न उठवेल असे ते म्हणाले. दत्तात्रय पानसरे यांनी मत व्यक्त केलं त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. दत्तात्रय पानसरे यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन अर्ज माघार घेतला त्यांचे आभार असे तनपुरे म्हणाले.
अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या दिवशी राज्यभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर महाविकास आघाडीनं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मविआच्या काही उमेदवारांनी संख्याबळाचं कारण, मित्रपक्षांचं सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत माघार घेतली. तर, महायुतीच्या नेत्यांना देखील बंडखोरांना शांत करण्यात यश आलं. नितेश राणे थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण विधानपरिषदेचे उमेदवार बाळ माने यांना अर्ज मागं घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तर, नाशिकमध्ये गोकुळ गीते अर्ज माघारीवरुन चर्चेत राहिले, तर गणेश गीते यांनी सकाळीच अर्ज मागं घेणार असल्याचं स्पष्ट केलं. अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या, यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका जागेवर भाजपनं बिनविरोध विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या:
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 17 पैकी 5 जागा बिनविरोध, 12 ठिकाणी महायुती आणि मविआ आमने सामने, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते आमने सामने
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा























