Ahilyanagar News: रात्रंदिवस नवऱ्याशी चालणारे व्हॉट्सॲप चॅटिंग (WhatsApp Chatting), नियमित होणाऱ्या भेटीगाठी आणि कौटुंबिक शांतता भंग झाल्याच्या रागातून एका संतप्त झालेल्या पत्नीने थेट शाळा गाठून संबंधित प्राथमिक शिक्षिकेला (Primary Teacher) चांगलाच धडा शिकवल्याची घटना श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात घडली आहे. भरदिवसा आणि शाळा सुरू असतानाच हा हायव्होल्टेज ड्रामा घडल्याने संपूर्ण अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

Continues below advertisement

Ahilyanagar News: नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर (Belapur) परिसरात स्वतःला उच्चशिक्षित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता सांगणारा एक तरुण सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच सक्रिय असतो. वर्षभरापूर्वी या तरुणाचे परिसरातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेशी सूत जुळले. हळूहळू हे प्रकरण इतके वाढले की, हा कार्यकर्ता संबंधित 'मॅडमला' शाळेत सोडणे आणि आणण्यासाठी स्वतःच्या वाहनाने (Vehicle) थेट नेवासा फाट्यापर्यंत जाऊ लागला. रात्री उशिरापर्यंत चालणारे चॅटिंग आणि संशयास्पद हालचालींमुळे कार्यकर्त्याच्या पत्नीचा संशय बळावला. पत्नीने नवऱ्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. अखेर नवऱ्याचे शिक्षिकेशी सुरू असलेले प्रेमप्रकरण (Extramarital Affair) उघडकीस आल्याने पत्नीचा संयम सुटला.

Ahilyanagar News: शाळेच्या आवारातच रंगला हायव्होल्टेज ड्रामा

संतप्त पत्नीने थेट संबंधित शाळा गाठली. वर्गाच्या (Classroom) बाहेर असलेल्या त्या शिक्षिकेला पाहताच पत्नीचा राग अनावर झाला. रौद्ररूप धारण करत तिने थेट शिक्षिकेचे केस पकडत सर्वांसमोरच जाब विचारण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शाळेच्या आवारात मोठी घबराट आणि गोंधळ उडाला. लोक गोळा होत असल्याचे पाहून संबंधित शिक्षिकेने तेथून काढता पाय घेतला.

Continues below advertisement

Ahilyanagar News: ग्रामस्थ आक्रमक; शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी

शाळेसारख्या पवित्र ठिकाणी असा प्रकार घडल्याने आणि शिक्षिकेच्या वर्तणुकीमुळे संतप्त ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संबंधित शिक्षिकेला तात्काळ निलंबित (Suspend) करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे. आता शाळा प्रशासन संबंधित शिक्षिकेवर काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune FDA Raid: पुण्यातील द न्यू पूना क्लबवर एफडीएची मोठी कारवाई; क्लबच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा, साचलेले पाणी अन् फ्रीजजवळ अस्वच्छ शौचालय दिसलं

Mumbai Crime News: नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा